🔹निष्ठावान कार्यकर्त्यात संताप, मनसेने पूर्व विदर्भातील ही जागा गमावली असल्याची चर्चा
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि .25 ऑक्टोबर) :-
राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देतो असे वाटतं असतांना आता चक्क मनसेत पक्ष स्थापनपासून पक्षात काम करणारे व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मोर्चे आंदोलने करून गोरगरीब कष्टकारी जनतेचा आवाज बनलेले मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून पडतीच्या काळात पक्ष सोडून भाजप मध्ये गेलेल्या प्रवीण सूर यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यात कामालीचा संताप व्यक्त होत आहे.
राज्यात सन 2014 मध्ये मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला होता व सर्वत्र पक्ष हरला होता त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष असलेले प्रवीण सूर हे मनसे सोडून भाजप मध्ये गेलेल्या आमदार प्रवीण दरेकर यांच्या सांगण्यावरून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजप मध्ये प्रवेश केला होता व या विधानसभा क्षेत्रात पक्ष संपवला होता, मात्र अशा परिस्थितीत या क्षेत्रात तत्कालीन जिल्हा सचिव व नंतर या क्षेत्राचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी हातात सूत्र घेत पक्षाचे संघटन वाढवून मागील विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या नेतृत्वात रमेश राजूरकर या नवख्या उमेदवाराला उभे करून तब्बल 35 हजार मतदान मिळवून दिले होते मात्र आज त्याचं राजू कुकडे यांना पक्षाच्या अंतर्गत विरोधकांनी पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या व भाजप मधून आलेल्या प्रवीण सूर यांना उमेदवारी देऊन या ठिकाणी मनसेचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी शक्यता सर्वत्र वर्तवली जात असतांना ही महत्वाची जिंकली जाणारी मनसेची जागा हरली हरली असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षाची जोरदार बांधणी केली आहे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या वरोरा व भद्रावती या दोनही तालुक्यात “राजगड” या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार भरवून भरवून गावखेड्यावर मनसेची ताकत वाढवलेली होती, या भागातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न त्यांनी सोडवीला, या भागातील पांधन रस्त्याचे प्रश्न त्यांनी सोडविले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता त्यांनी आंदोलने केली त्यामुळे शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून राजू कुकडे यांना मनसेची या क्षेत्रात उमेदवारी द्या अशी मागणी केली होती अर्थात या विधानसभा निवडणुकीत राजू कुकडे हे शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने निवडून येणार अशी या क्षेत्रातील सर्वाना आशा होती, मात्र पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे चुकीची माहिती दिली आणि या ठिकाणी मनसेचा राजू कुकडे आमदार होणार अशी परिस्थिती असतांना पक्षांसोबत गद्दारी करून भाजप मध्ये गेलेल्या प्रवीण सूर यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते व मनसे समर्थक यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
प्रवीण सूर यांच्या श्री साई नागरी सहकारी संस्थेत कोट्यावधीचा घोटाळा?
मनसेने उमेदवारी दिलेल्या प्रवीण सूर हे अध्यक्ष असलेल्या श्री साई नागरी सहकारी पत संस्थेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी उघड केली होती, त्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार हे सुद्धा संचालक असल्याने त्यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात येऊन या सर्व संचालकावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती, दरम्यान जिल्हा उपनिबंधक सारडा यांनी श्री साई नागरी सहकारी पत संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे काही दिवसातच या पत संस्थेचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर येऊन संचालकावर गुन्हे दाखल होऊ शकते. पण आता ऐन निवडणूकीच्या काळात हा घोटाळा समोर आला तर प्रवीण सूर यांच्यावर केव्हाही कार्यवाही होऊ शकते आणि त्यांनी पत संस्थेचे पैसे स्वतःच्या प्रापर्टी करिता वापरले असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर मनी लॉंड्रीन्ग ऍक्ट अंतर्गत कार्यवाही होऊ शकते त्यामुळे प्रवीण सूर यांना दिलेली उमेदवारी ही मनसेच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.