शेतमालाला हमी भावाने खरेदी करा ;शेतकर्‍यांचे तहसिलदाराला निवेदन

Share News

🔸विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.23 आक्टोंबर) :- शेतातील खरीप हंगामातील माल हमी भावाने खरेदी करा तसेच अन्य अशा विविध मागण्यांना घेवून नुकतेच वरोरा येथे तहसिलदारामार्फत जिल्हाधिकार्‍यांना वरोरा तालुक्यातील शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ता किशोर डुकरे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

सदर मागण्यांमध्ये खरीप हंगामातील संपूर्ण शेतमाल हमी भावाने खरेदी करणे, शेतकरी यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या गाडयांना टोलमुक्त करा,तसेच चालु हंगामात शेतकरी यांनी आपले सोयीबीन हे पीक काढून बाजारपेठेत विक्री करीता आणत असून तो माल हमी भाव पेक्षा कमी दराने खरेदी, आणि नगदी पैसे देण्यासाठी १ टक्के घेणार्‍या व्यापारी यांच्यावर कारवाई करा,तसेच परतीच्या पावसामुळे या वर्षी झालेल्या सोयाबीन, कापूस आणि धान या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानी बाबात पिक विमा कंपनीला ऑनलाईन तक्रार करूनही अद्याप पिकांची पाहणी न केल्याबाबत अशा आदी विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.

सदर मागण्यांवर शासनाने तोडगा काढवा अन्यथा येत्या आठ दिवसात शेतकर्‍यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. यावेळी निवेदन देताना शेतकरी किशोर डुकरे, प्रसाद मिलमिले, हनुमान उरकांडे, किशोर खिरटकर, विनायक डुकरे, लक्ष्मण आसुटकर, तुळशीराम बावणे, दिपांश नन्नावरे, मेहेश वराटकर, देविदास चवले,ऋषी आत्राम आदिसह शेतकरी उपस्थित होते.

Share News

More From Author

अवैध उत्खनन करणारी एक जेसीबी मशीन व पाच ट्रॅक्टर जप्त

देऊळगाव राजा येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *