शेगाव येथील मस्कऱ्या गणपतीचे थाटात विसर्जन

Share News

🔸शेगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त

🔹डिजे ढोल ताशांच्या तालात तरुणाई थिरकली

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.2 ऑक्टोबर) :- चंद्रपूर जिल्हात मस्कऱ्या गणपती विसर्जन हे तिसऱ्या ते चौथ्या क्रमांकावर आहे व वरोरा तालुक्यात प्रथम क्रमांकावर आहे . त्यामुळे शेगाव बू येथे दरवर्षी मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहाने साजरा होत असून येथील विसर्जन पाहण्या करिता हजोरो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

  विशेष म्हणजे शेगाव नगरी मध्ये ” मूर्ती लहान कीर्ती महान ” अशी परंपरा कायम असल्याने प्रत्येक मस्कऱ्या गणेश मंडळांचा हजारो रुपयांचा खर्च असून सर्वाधिक आपला गणेश मंडळ सर्वाधिक सुशोभित कसा दिसेल या कडे प्रत्येक मंडळाचे अधिक लक्ष असते तेव्हा सर्वस्वी मंडळ डीजे , ढोल ताशे , फटाक्याची आतषबाजी , सुशोभित देखावे , अश्या अनेक उपक्रमाने शेगाव नगरी तसेच परिसरातील नागरिकांचे मने मोहून टाकतात.

त्यामुळे येथे परिसरातील अनेक गणेश भक्त शेगाव नगरी मध्ये दाखल होऊन या आनंदक्षणी सहभागी होतात. दरवर्षी गावात छोटे मोठे मंडळ सहभागी होत असून दरवर्षी मंडळात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.यावर्षी देखील एकूण २२ते २३ गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता विसर्जन पाहण्यासाठी येत असलेल्या भाविक भक्ताच्या सुख सोई करिता अनेक ठिकाणी चौका चौकात पिण्याचे पाणी , मसाले भात , भोजन दान , यांची विशेष सोय उपलब्ध केली होती .

  गणेश विसर्जन पाहण्याकरिता परिसरातील लाखो भाविक येत असल्याने या आनंदमय सुखमय क्षणी काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शेगाव येथील ठाणेदार श्री योगेंदर सिंग यादव psi महादेव सुरजुसे यांच्या मार्गदर्शनात यांच्या ताफ्यासह सैनिक यांची चौका चौकात चोख बंदोबस्त लावण्यात आला . विसर्जन सूशानततेत पार पडावे याकरिता शेगाव पोलीस कर्मचारी तसेच शांतता कमेठी शेगाव तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी नागरिकांनी फार मोठे मोलाचे सहकार्य केले.

Share News

More From Author

चिनोरा येथील युवकांचा पोलीस व शासनाच्या इतर विभागात नियुक्त्या 

कोल वेतन वाढीसाठी कामगार गुरुवारपासून केपीसीएल खान बंद पाडणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *