चिनोरा येथील युवकांचा पोलीस व शासनाच्या इतर विभागात नियुक्त्या 

Share News

🔸ग्रामपंचायतीच्या वतीने नवनियुक्त पोलिस,एसआरपिएफ व सैन्यात भरती झालेल्यांचा सत्कार 

🔹चिनोरा गावाची वेगळी ओळख,गावात आनंदाचे वातावरण 

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.2 ऑक्टोबर) :- जिद्द चिकाटी परिश्रम व मनोबल च्या जोरावर व्यक्ती आपल्या जीवनात काय करू शकतो ते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चिनोरा येथील युवकांनी नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती व सैन्यात शासकीय सेवेत नोकरी मिळवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दाखविले आहे .

वरोरा शहरालगत असलेल्या चंद्रपूर नागपूर महामार्गावरील चिनोरा गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास आहे गावातील उच्च शिक्षित तरुण मुले मुली सतत पोलिस भरती, सैन्य भरती साठी प्रयत्न करत असतात अखेर दहा मुलांना यश संपादन करता आले यामध्ये आशिष शेळकी नागपूर पोलिस, स्वप्निल तिखट एस आर पि एफ, चेतन बावणे ठाणे शहर पोलिस, विशाल मिसार,एस आर पि एफ स्नेहा किन्नाके चंद्रपूर पोलीस, शुभम परचाके मुंबई पोलीस,साहील बावणे व ओम पातालबंशी यांची सैन्यात देश सेवेसाठी निवड झाली लवकरच त्यांना प्रशिक्षणासाठी पाचारण करण्यात येणार आहे.नवनियुक्त पोलिस,एस आर पि एफ,व सैन्यात भरती झालेल्या युवकांचा चिनोरा ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत भवनामध्ये जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश ढेंगळे ,सरपंच ताई परचाके, उपसरपंच वंदना ढेंगळे ,सचिव तथा ग्रामपंचायत अधिकारी श्री एकनाथ चाफले ,सदस्य निलेश डोंगरकर तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश कांमडी , सदस्या अनिता बोथले, ज्योती गायकवाड,व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, नवनियुक्त पोलिस, आर्मी सैनिक यांचेवर विविध स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share News

More From Author

बांद्रा येथे शिवसेना (उबाठा) शाखेच्या फलकाचे उद्घाटन

शेगाव येथील मस्कऱ्या गणपतीचे थाटात विसर्जन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *