राष्ट्रवादी मोटरचालक कामगार वाहतूक सोलापूर सेल तर्फे महाराष्ट्रातील पहिल्या महिला कंटेनर चालक राणी पवार “चालक महारत्न” पुरस्काराने सन्मानित

Share News

✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.2 ऑक्टोबर) :- देशाच्या रक्षणासाठी सीमेवर ज्याप्रमाणे भारताचे जवान अहोरात्र संरक्षण करता त्याचप्रमाणे चालक हे देखील आपली सेवा बजावतात देशाच्या अंतर्गत दळण वळणाचा कणा आहे अन्नधान्य अत्यावश्यक मालवाहतूक प्रवासी वाहतूक वेळेवर करण्यासाठी चालक महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटार मालक कामगार वाहतूक सेल व टीव्हीएस क्रेडिट सर्विस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रुग्णवाहिका घंटागाडी अग्निशामक रिक्षा यासह इतर वाहन चालकाचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोलापूर येथील महाराष्ट्रातील पहिली महिला कंटेनर राणी पवार यांना चालक महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी पवार यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा चा वर्षा होत आहे यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Share News

More From Author

चंद्रपूर येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता

खंडाळा तालुका शाखा उद्घाटन व वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील भोसले साहेब यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *