चिकणी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न

Share News

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि .29 सप्टेंबर) : – चला बदल घड़वुया या मोहिमे अंतर्गत वरोरा-भद्रावती मतदरसंघात डोळे तपासणी, आरोग्य तपासनी शिबिरे, मॅरेथाॅन स्पर्धा, व्यवसाय मार्गदर्शन, प्रेरणेतुन प्रगति, असे विविध सकारात्मक व समाज उपयोगी उपक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत, या मोहिमे अंतर्गत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु वरोरा तालुक्यातील चिकणी येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते.

         या शिबीराला चिकणी, बोपापूर, खापरी, टाकळी, डोंगरगाव, शेगाव, खरवड, गौळ,नागरी,केळी, महाडोळी, वाघनख, या गावातील १०१२ नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.

 या कार्यक्रमाचे उदघाटन मा.सुरेश माथनकर, यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. चेतन खुटेमाटे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जर्नादन देठे, किशोर झाडे, संगिता खारकर, आनंदराव दातारकर, पंढरी बुचूंडे, नरेंद्र माथनकर, पंढरी देहारकर, सुनिल येळेकर, नथ्थुजी गावंडे, मेघश्याम बोधे, रामभाऊ येडेकर, खिरटकर महाराज, गजानन येळेकर, सुरेश साळवे, प्रणिल खंगार हे मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक सुधाकर खरवडे, संचालन चंद्रशेखर झाडे, आभार प्रदर्शन संदिप सोनेकर यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम प्रविन वासेकर, विजय झाडे, विठ्ठल भेदुरकर,मारोती जवादे, विलास घाईत, ताराचंद बोरेकर, मारोती कुत्तरमारे, सुनिल डोंगरे, रंजना भुसारी, अनुप खुटेमाटे, सचिन खुटेमाटे, महेश आस्कर अथक प्रयत्न केले.

Share News

More From Author

आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल

कापुस – सोयाबीन अनुदानास सरकारकडून’तारीख पे तारीख…विनोद उमरे यांचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *