भद्रावती शहरात गोविंद लेआउट येथे घरफोडी

Share News

🔸सोने-चांदी व रोख रकमेसह २ लाख १० हजाराचा मुद्देमाल लंपास 

✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी) 

भद्रावती(दि.28 सप्टेंबर) :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरू असून काही दिवस पूर्वी चोरट्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी निओमी साटम (आयपीएस) यांच्या भाड्याच्या घराला लक्ष्य केले होते. ही घटना ताजी असतानाच भद्रावती-शहरातील गोविंद ले -आउट येथे राहते घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोने-चांदी व रोख रकमेसह २ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना दिनांक २७ च्या मध्यरात्री घडली.

अविनाश ठवकर ही आपल्या मुलासह गोविंद ले -आउट येथे राहते ती दिनांक २६ रोज गुरुवारला मुलीकडे जेवण करण्याकरता गेली त्यानंतर रात्रोला तिथेच थांबली आज २७ रोज गुरुवारला पहाटे घरी आली असता घरासमोरील लोखंडी गेट व दरवाज्यातील कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले त्यानंतर घरातील कपाट उघडे दिसले त्यातील सोन्या – चांदीचे दागिने किंमत १ लाख ४५ हजार व रोख रक्कम ६५ हजार असा एकूण २ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलीस अज्ञात चोट्यांचा शोध घेत आहे पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Share News

More From Author

प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *