🔸राजुरा विधानसभेत फिरणारे लाभार्थी सन्मान यात्रेचा गोवारीतून शुभारंभ
✒️नितेश केराम कोरपना(Korapana प्रतिनिधी)
कोरपना(दि.27 सप्टेंबर) :- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असलेले आपले महायुती सरकार सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहे समाजातील शेवटच्या घट कापर्यत शासनाच्या योजना व त्यांचा थेट लाभ पोहचावा यासाठी शासन प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे त्यामुळे गोवरीतील नागरिकांनीही केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे विधानसभा निवणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजुरा विधानसभा क्षेत्रात आ लेल्या लाभार्थी सन्मान यात्रेचा आज तालुक्यातील गोवरी येथून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना थेट जनतेपर्यत पोहवण्याच्या उद्देशाने भाजपतर्फे सम्पूर्ण महाराष्ट्रात विधानसभाश लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे याच पार्शभूमीवर राजुरा विधानसभा क्षेत्रात आलेल्या लाभार्थी सन्मान यात्रेचे ( लाभार्थी मेला ) आज गोवरी येथून विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आले .
गोवरी येतील जि प शाळेसमोरील पटांगणावर भरवलेल्या या लाभार्थी सन्मान यात्रेला ( लाभार्थी मेला ) गोवरी वासियांनी ही उत्स्फूर्त पतिसाद दिला दिवसभर चाललेल्या या लाभार्थी मेल्यामध्ये समाजातील विविध घटकांसाठी असलेल्या शासनाच्या योजणांची माहिती देणारे स्टॉल शासनाच्या जणहितकारी निर्णयांची माहिती सांगणारे एल ई डी वाल महिलांसाठी निरनिराळे खेळ तसेच बालगोपालांसाठी मनोरंजनात्मक जादुचे प्रयोग अशा कितीतरी कार्यक्रमांची रेलचेल होती .
आपल्या मनोगतात पुढे बोलताना आपल्या राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली ती राज्यभर लोकप्रिय ठरली माझ्या भगिनींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले हें विरोधकांना बघवत नाही ते ही योजना बंद पाडायला निघाले कोर्टात गेले आम्ही शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली एक रुपयात पीक विमा योजना आणून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.
याठिकाणी छोटया छोटया शालेय मुली आहेत आपल्या राज्य सरकारने मुलींसाठी शिक्षण मोफत केल आहे राज्यातील गोरगरीबाची लेक चांगली शिकून मोठी झाली पाहिजे प्रत्येक मुलीनं स्वतः ची व आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी शिक्षणाचा मार्ग राज्य सरकारने सुकर केला आहे त्याचा लाभ अधिकाधिक मुलींनी घ्यावा असेही ते मनाले .
यावेळी तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे महिला मोर्चाच्या महामंत्री पौर्णिमा उरकुडे तालुका सचिव दीपक झाडे शहर भाजपयुमोचे महामंत्री प्रदीप मोरे शिवाजी हायस्कूलचे मुख्यद्यापक जंगलू पा देरकर चलाख सर भूषण जुनघरे हर्षल वनकर अनिल वाकडे आदी सह गोवरी वासियांची उपस्थिती होती.