देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून आयोजन
नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)
कोरपना(दि.1 सप्टेंबर) :- देशाच्या कृषिप्रधान संस्कृतीत शेतकरी मित्र सर्जा राजाच्या श्रमाला अनन्य महत्व आहे त्याचा सहकार्यप्रती कृतज्ञनता व्यक्त करण्यासाठी सम्पूर्ण भारतात बैल पोळा हा सण मोट्या उत्साहात साजरा करण्यात येतो या पारंपरिक सनाचा उत्साह वाढदिवसाठी यंदा बैलपोळ्याच्या दिवशी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा कोरपना गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बैलपोळा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
माजी जि प अध्येक्ष तथा भाजपाचे विधानसभा निवडूनक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रातील ठिकठिकाणच्या मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र यांच्या वतीने या सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून प्रत्येक गावामध्ये आकर्षण सजावट असणाऱ्या तीन बैलजोड्याचे परीक्षण करण्यात येऊन त्याठिकाणी विजेत्याना भेट वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजा कडून देण्यात आली आहे तरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधवानी मोट्या संख्येने या सजावट स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान आयोजक देवराव भोंगळे यांनी केले.