शेरखान पठाण यांची तिसऱ्यांदा शा. स.अध्यक्ष पदी निवड

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बूज(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बूज(दि.1 सप्टेंबर) :- स्थानिक शेगाव बूज येथे आज चिमूर एज्युकेशन सोसायटी चिमूर द्वारा संचालित नेहरू विद्यालय तथा ज्युनियर कॉलेज शेगाव बूज. येथे शाळा व्यवस्थापन समिती ची निवड व पालक सभा शिक्षक सभा घेण्यात आली होती . यात सर्वस्वी गेल्या दोन वर्षा पासून या शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी शेरखान पठाण यांची नियुक्ती होती. आज पुन्हा नव्याने या अध्यक्ष पदाची निवड करण्यात येत होती.

परंतु शेरखान पठाण यांनी गेल्या दोन वर्षांत शाळे बद्दल आपली आपुलकी दाखवून शाळेच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य करिता अतोनात अथक प्रयत्न परिश्रम घेतले . त्यामुळे त्यांच्या प्रत्नाच्या कार्याची दखल घेत सर्व पालक तसेच शिक्षक यांनी पुन्हा तिसऱ्यांदा देखील सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समितीच्य अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या निवडीने येथील शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य श्री बालाजी ढाकुनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा प्रदान केल्यात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री बालाजी ढाकुनकर उपस्थित होते . प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री शंभरकर , वरभे मॅडम , मानकर , गजभे , इत्यादी हजर होते. तर यावेळी या सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

तसेच पालक वर्गानी देखील आपल्या पल्याविषयी अनेक समस्या मांडल्या सर्व विषय लक्षात घेऊन समस्या निकाली काढण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ , पालक शिक्षक संघ , सखी सावित्री संघ , इत्यादी समितीची स्थापना देखील करण्यात आली.

Share News

More From Author

काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उदघाटन

कान्सा ( शि. ) येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *