काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उदघाटन

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.1 सप्टेंबर) :- काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालय उदघाटन व अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवारी थाटात पार पडला.चंद्रपूर शहरातील आरटीओ ऑफीस समोर झालेल्या या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरहे, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, नम्रता ठेमस्कर,एड सातपुते, हिराचंद बोरकुटे,दिलीप चौधरी,पप्पू देशमुख, बंडू धोत्रे, नंदू नगरकर, सुनिता लोढीया यांच्यासह महाविकास आघाडी च्या अनेकांची उपस्थिती होती.

काँग्रेस पक्ष कसा वाढेल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, पक्ष मजबूत करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यातून हद्दपार करा असे खासदार धानोरकर यांनी म्हटले।. यावेळी काँग्रेस नेते राजू झोडे यांचे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.

Share News

More From Author

चंद्रपुर जिल्हयातील सर्व शाळेमध्ये लागणार CCTV कॅमेरा व अन्य सोयीसुविधा..सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या मागणीला यश 

शेरखान पठाण यांची तिसऱ्यांदा शा. स.अध्यक्ष पदी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *