भोगवटदार वर्ग -2 चे जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासंदर्भात वरोरा येथे जनसुनावणी

Share News

🔸डॉ. अंकुश आगलावे यांनी शेतकरी बांधवाना उपस्थित राहण्याचे केले आवाहन

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.31ऑगस्ट) :- वरोरा व भद्रावती तहसिल येथील शेतक-यांच्या शेतजमीनी भोगवटदार वर्ग -2 मधून वर्ग – 1 मध्ये करण्याबाबतची जनसुनावणी हंसराजजी अहीर, राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मागास आयोग भारत सरकार यांनी दि. 4/9/2024 रोजी कटारिया मंगल कार्यालय , वरोरा येथे सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे.

या जनसुनावणीत चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, वरोरा तसेच भद्रावती व वरोरा तहसिलदार उपस्थित राहणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसुल भोगवटदार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग- 1 मध्ये रूपांतरीत करणे नियम, 2019 अन्वये शेतकरी बांधवाना अर्ज सादर करता येणार आहे. याकरीता सातबारा, नमुना – 8 व विनंती अर्ज घेवून मोठया संख्येने शेतकरी बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. अंकुश आगलावे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले.

Share News

More From Author

विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे शिक्षक अखेर सापडलेच

शेगाव बूज, खांबाडा, टेमुर्डा, चारगाव परिसरातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *