विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे शिक्षक अखेर सापडलेच

Share News

🔹स्थानिक गुन्हे शाखा व सायबर टीमची बेधडक कारवाई

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.31 ऑगस्ट) :- येथील विद्यार्थीनीला विनयभंग प्रकरणातील फरार आरोपी शिक्षकांना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर टिम ने केली अटक ..

चंद्रपूर जिल्हयातील पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत एका प्रतिष्ठीत कॉलेचे दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्याथींनीला वाढदिवसाचे निमित्ताने आपले रुम वर बोलावुन तिला चाकलेट देवुन रिटर्न गिफ्ट मध्ये गळे मिल, हग कर असे म्हणुन जबरीने विद्याथींनीस गळे लागुन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असता विद्याथींनी मुलीने कशीबशी आपली सुटका करुन त्यांच्या तावडीतून सुटून पळ काढला व पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार नोंदविली असता वरोरा पोलीसांनी तात्काळ त्याची दखल घेवुन दोन्ही फरार शिक्षकांविरुध्द गुन्हा नोंद करुन सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी फरार आरोपीचा शोध घेणे सुरु केले.

पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार यांचे नेतृत्वात शोध पथक तयार करुन त्याचे समवेत सायबर पथक पाठवुन शोधाशोध घेतला असता दोन्ही शिक्षक हे रेल्वे स्टेशन मध्ये पळ काढण्याचे तयारीत असतांना त्यादोघांना ताब्यात घेवुन वरोरा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक श्री विनोद जांभळे यांचे स्वाधीन करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री अजिक्य तांबडे पोलीस स्टेशन वरोरा हे करीत आहे.

शिक्षक पेशीला काळीमा फासणारे फरार शिक्षकांना तात्काळ अटक करणे साठी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्वामीदास चार्लेकर, अजय बागेसर, अमोल सावे, नितेश महात्मे, गोपीनाथ नरोटे, नितीन रायपुरे, प्रफुल्ल गारगाघे स्थानिक गुन्हे शाखा पथकासह सायबर टिम चे मुजावर अली, कार्तिक खनके, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे व उमेश रोडे यांनी कामगिरी केली.

Share News

More From Author

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तारण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करा

भोगवटदार वर्ग -2 चे जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासंदर्भात वरोरा येथे जनसुनावणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *