वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तारण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करा

Share News

🔹मनसेची विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांच्याकडे मागणी

🔸कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.30 ऑगस्ट) :- वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तारण घोटाळ्याची चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करा व कांदा घोटाळ्यातील शेतकऱ्यांचे सीज केलेले बैंक खाते सुरु करून बाजार समितीतील गाळे लिलाव प्रकरणात अमानत रक्कम ग्राहकांना परत करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतुन प्रशासनाला दिला आहे.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत ०१८ मागील वर्षी कांदा घोटाळा उघडकीस आला होता. तो घोटाळा 2 कोटी 30 लाख 73 हजार रुपयाचा होता. त्या घोटाळ्यात अनेक संचालकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले होते, त्याची चौकशी झाली.

परंतु यातील मुख्य आरोपी सचिव चंद्रसेन शिंदे यांना दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेऊन पुन्हा याचं ठिकाणी सचिव पदाचा पदभार सांभाळला, दरम्यान आता त्यांच्याच कार्यकाळात तारण योजनेत 46 लाख 62 190 रुपयाच्या रक्कमेची अपरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे व या प्रकरणात संचालक मंडळानी येथील पर्यवेक्षक कोमल गारघाटे यांच्याबर निलंबनाची कार्यवाही केली आहे. खरं तर केवळ या प्रकरणात पर्यवेक्षक दोषी नसून सचिव, लेखापाल आणि सभापती उपसभापती हे तेवढेच दोषी आहे.

कारण एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करतांना किमान लेखापाल व सचिव यांच्या लक्षात तर यायलाच पाहिजे, परंतु तारण घोटाळा हा केवळ विद्यमान संचालक असतानाचा नाही तर हा सन 2021-22 पासून सुरु असून यामध्ये विद्यमान संचालक दोषी आहेतचं शिवाय भूतपूर्व (या अगोदर असलेले) संचालक सुद्धा दोषी आहेत, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र नेहमी शेतकऱ्यांना पुढे करून घोटाळा करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ शेतकऱ्यांचे बैंक खाते गोठवल्या जाते तेंव्हा मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गप्प असतात, त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.

तारण घोटाळा हा कांदा घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा होऊ शकतो अशी शक्यता आहे, कारण हा तारण घोटाळा सन 2021-22 पासून सुरु असून आजपर्यंत कोट्यावधी रुपयाची उलाढाल या माध्यमातून झाली असावी अशी शंका आहे, कांदा घोटाळ्यातील लाभधारक शेतकरी यांच्या बैंक खात्यातून एजंट दलाल यांच्या मार्फत संबंधित बाजार समितीच्या अधिकारी व काही संचालक पदाधिकाऱ्यांनी पैसे घेतले होते हे समोर आले होते, मात्र या प्रकरणात कुठलाही एजंट आणि दलाल यासह संचालक मंडळाचे तत्कालीन पदभार सपंलेले व्यक्ती 

यांच्यावर पैसे वसुलीची कार्यवाही झाली नाही तर त्याचा भुर्दंड शेतकऱ्यावर पडला आणि लाभार्थी असलेल्या शेतकऱ्याच्या बैंक खात्यात जे पैसे जमा झाले त्या लाभार्थी शेतकऱ्यांचे बैंक खाते सीज केले गेले, या प्रकरणात शेतकरी सरळ दोषी नसताना सुद्धा त्यांचे बैंक खाते सीज करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे, दरम्यान घेतकऱ्यांच्या या बैंक खात्यात सरकारी योजणांचे पैसे जमा झाले ते पैसे सुद्धा बँकेमार्फत कपात केले जातं असल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे याकडे राजू कुकडे यांनी लक्ष वेधले.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी आणि संचालक मंडळाचे अनेक घोटाळे असून तारण घोटाळा त्यात आता अग्रस्थानी आहे कारण त्यात विद्यमान संचालक यासह माजी संचालक सुद्धा गुंतलेले आहे, दरम्यान बाजार समितीच्या गाळे लिलाव प्रक्रियेत सहभागी घेतलेल्या 10-12 ग्राहकांची अमानत रक्कम परत करण्यास ते टाळाटाळ करत असून तुम्हची अमानत रक्कम गाळे लिलावातील अटी शर्तीनुसार जप्त करण्यात आल्याचे बाजार समितीचे सचिव सांगतात, यांचा अर्थ लिलाव धाकांची अमानत रक्कम सुद्धा ते हडप करण्याच्या मानसिकतेत असल्याने या संपूर्ण प्रकारणाची उच्चस्तरीय चौकशी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून करून दोषीवर कर्मचारी अधिकारी यांच्यावर निलंबानाची व संचालकांवर पदमुक्त करण्याची कार्यवाही करून त्यांच्याकडून अफारातफर झालेल्या पैशाची सक्तीने वसुली करण्यात यावी .

अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, महेश वासलावार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, मोहित हिवरकर, किशोर धोटे, पियुष धुपे, बाळू गेडाम व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share News

More From Author

मनोहर हनवते तिसऱ्यांदा तं.मु.स.अध्यक्षपदी अविरोध

विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे शिक्षक अखेर सापडलेच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *