मेडीकेअर हॉस्पिटलचा भावनिक उपक्रम बेटी बचाव बेटी पढाओ

Share News

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.30 ऑगस्ट) :- मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी हडपसर माळवाडी येथे असलेल्या मेडीकेअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ गणेश राख सर यांची भेट घेतली.

 डॉ राख सर यांच्या उपक्रमाची दखल दस्तुर खुद महा नायक श्री अमिताभ बच्चन यांनी तसेच भारतासहित अनेक देशांनी घेतली आहे.

या वेळी राख सर यांनी आपल्या हॉस्पिटल मध्ये मुलगी जन्माला आली तर संपूर्ण खर्च मोफत केला जातो हॉस्पिटल सर्व खर्च उचलते असे सांगितले.आणि ज्या वेळी मातेला आणि नवजात बाळाला घरी सोडलं जातं त्या वेळी त्या मुलीचं म्हणजेच बाळाचं औक्षण करून तिच्या जन्माचे केक कापून हार फुलांनी सजवून तिला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात येतो आणि या प्रसंगी हे भाग्य मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांना मिळालं. 

ही भेट मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे सर यांच्या माध्यमातून घडली.

या शुभ प्रसंगी संपूर्ण हॉस्पिटल स्टाफ डॉक्टर्स आणि डॉक्टर्स सेलचे डॉ श्री लालासाहेब गायकवाड हे ही उपस्थित होते.

Share News

More From Author

वरोरा येथे एका शाळेच्या शिक्षकांनी 16 वर्षीय विद्यार्थिनीचा केला विनयभंग

मनोहर हनवते तिसऱ्यांदा तं.मु.स.अध्यक्षपदी अविरोध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *