श्री गणेश मूर्ती खरेदीदार भाग्यवान विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसे

Share News

🔹चांदा क्लब येथील प्रदर्शनीत लकी ड्रॉचे आयोजन  

✒️ सुनील चटकी चंद्रपूर(Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि .29 ऑगस्ट) : – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनीत श्री गणेश मूर्तीची खरेदी करणाऱ्या भाग्यवान खरेदीदारांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार आहेत.

      येत्या ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्वास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.

    यावेळी खरेदीस नागरिकांची गर्दी, वाहनांची गर्दी, खरेदीस पुरेसा वेळ न मिळणे, दुचाकी वाहन सोबत असेल तर वाहन उभे करायला जागेचा प्रश्न,चारचाकी वाहन असेल तर सुरक्षित जागी वाहन उभे करून खरेदीस दूर पायी चालत जावे लागते.

सोबत परिवाराचे सदस्य असतील तर खरेदी करतांना होणारा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणुन यावर्षी मनपाने चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली असुन त्यामुळे नागरिकांना एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार आहे.

उत्सव काळात होणारी गर्दी वाहतूक कोंडी यामुळे निर्माण होऊ शकणार नसुन नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता येणार आहे शिवाय या मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील २० भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु इस्त्री, मिक्सर स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत.

Share News

More From Author

एक कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस

जनता विद्यालयात सायबर क्राईम रस्ते सुरक्षा व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम संपन्न 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *