जावेद रजा यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.29 ऑगस्ट) : – स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया अँड टेक्निकल संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी घनकचरा व्यवस्थापन आणि उत्कृष्ट पाणी वितरण या श्रेणीत राज्यातून प्रथम पुरस्कार वरोरा येथील रहिवासी जावेद रजा यांना प्रदान करण्यात आला.

     जावेद रजा यांना हा पुरस्कार 24 ऑगस्ट रोजी नागपूर येथील रिजेंटा सेंट्रल हॉटेल मध्ये आयोजित एका भव्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ट्रॉफी व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे जावेद रजा हे जिल्ह्यातील वरोरा, नागभीड व सिंदेवाही येथे या श्रेणीत अनेक वर्षापासून ही सेवा देत आहे.

            या संस्थेने राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणातून जावेद रजा यांची निवड करण्यात आली. या श्रेणीत अनेक वर्षापासून जावेद रजा करत असलेल्या कामाची दखल या घेऊन संस्थेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. स्विफ्ट व लिफ्ट मीडिया व टेक्निकल संस्थेतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पुरुष व्यक्तींना अशा प्रकारचे पुरस्कार दिले जातात. वरोरा सारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या जावेद रजा यांची निवड या पुरस्कारासाठी व्हावी हे कौतुकास्पद असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share News

More From Author

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असफल…शेतकरी नेते किशोर डुकरे यांची जाहीर टीका 

कान्सा ( शि. ) येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *