17वर्षाआतिल राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नाशिक संघ विजेता दुतिय क्रमांक अमरावती जिल्हा तृतीय क्रमांक अहमदनगर 

Share News

✒️नाशिक(Nashik विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

नाशिक(दि.29 ऑगस्ट) :- टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी 17 वर्षा आतिल टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा मिशन हायस्कूल ग्राउंड बारामती (पुणे) येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये प्रथम क्रमांक नाशिक, दुतिय क्रमांक अमरावती जिल्हा, तृतीय क्रमांक अहमदनगर,चौथा क्रमांक रायगड तसेच मुलामध्ये.

प्रथम क्रमांक सातारा जिल्हा ,द्वितीय सिंधुदुर्ग जिल्हा ,तृतीय भंडारा जिल्हा, चौथा क्रमांक परभणी यासंघानी विजयी श्री मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, सहसचिव चंद्रकांत तोरणे ,महिला डायरेक्टर धनश्री गिरी, विलास गिरी,संदिप पाटिल,महेश मिक्षा व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड पुणे ग्रामीण अध्यक्ष आशिष डोईफोडे, सचिव सातपुते मॅम , सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर , सोलापूर जिल्हा सचिव अजित शेख औरंगाबाद जिल्हा सचिव सय्यद अहमदनगर जिल्हा सचिव महाराष्ट्राचे खजिनदार घनश्याम सानप , रामा रणदिवे, ज्ञानेश्वर जाधव, रवी गुडे ,विजय सुखदेव ,नितीन सराफ, महेश पालघर कुशाल देशमुख ,मनोज कापेकर , कुणाल हळदणकर, सिद्धेश गुरव, आनंद गिरी, सुशील तांबे, संदीप खलाणे व जिल्हा सचिव, संघ व्यवस्थापक ,क्रीडा शिक्षक व खेळाडू व महाराष्ट्र पंच इत्यादी उपस्थित होते भारतीय टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले.

17वर्षा आतिल राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप पुणे मधील मिशन हायस्कूल ग्राउंड बारामती (पुणे) येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 36 संघ व मुलींचे सात संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना नाशिक विरुद्ध अमरावती जिल्हा यांच्या झाला नाशिक संघाने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळून दिला ,जिल्हा अमरावती संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला.

तसेच भंडारा संघाला तिसरा क्रमांक मिळाला तसेच मुलाच्या संघामध्ये अंतिम सामना सातारा विरुद्ध सिंधुदुर्ग होऊन सातारा नी उत्कृष्ट खेळल करत संघाला विजयश्री मिळवून दिला तर उपविजयी सिंधुदुर्ग जिल्हा मिळाल्याबद्दल बद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट फाउंडर कन्हैया गुज्जर, भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी ,,महेश मिक्षा विजय बिराजदार, घनश्याम सानप,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. विजयी संघाचे मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

पंच म्हणून संदीप पाटील, धनश्री गिरी,धनंजय लोखंडे,, सुनील मोरय,लखन देशमुख , ओमकार पवार ,, सिध्देश गुख ,कुणाल हळदणकर,श्री कारकर ,अर्जुन वाघमारे , सोमा बीराबदार , सागर मोरे , प्रीत केन यांनी काम बघितले.

Share News

More From Author

सकल हिंदू समाजतर्फे वरोऱ्यात ऐतिहासिक दहीहंडी महोत्सव सम्पन्न 

जिल्ह्यातील हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारी पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामात करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *