आठ दिवसांपूर्वी नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळला

Share News

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.30 जुलै) :- आठ दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अखेर दिनांक २८ रोज रविवारला सायंकाळी पाच वाजता खुटवंडा येथील नाल्याच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अमित पेंदाम, वय 24 वर्षे, राहणार खुटवंडा असे या मृतक युवकाचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी मुसळधार पावसामुळे सदर नाल्याला पूर आला होता. नाल्याजवळ उभ्या असलेल्या या युवकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व वाहून गेला. त्याला शोधण्याची मोहीम चार-पाच दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत होती.

मात्र पुरामुळे त्याचा शोध लागला नव्हता. अखेर पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्याच्या पात्रात आढळून आला. या शोधमोहिमेत आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचा खेद पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुडे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.

Share News

More From Author

शेगाव बू येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन के अलग अलग विभागों से हो रहा भ्रष्टाचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *