शेगाव बू येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु(दि.30 जुलै) :- प्रबोधन मंडळ शेगाव बु.सत्कार गुणवंताचा कार्यक्रम लक्ष्मी लाॅन भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते मा श्री विजयंराव तांबे सचिव सेवाग्राम आश्रम जिल्हा वर्धा, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री प्राचार्य श्री पु.मा काळभूत सर सेवानिवृत्त प्राचार्य आनंदवन निकेतन महाविद्यालय वरोरा , प्रमुख उपस्थिती :-श्री प्रशांत नागोसे, श्री प्रकाश जी पदमावर, डॉ खोब्रागडे साहेब, प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष विनोद चिकटे सर , पाहुण्याच्या हस्ते.प्रथम आलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी वर्ग ४था यश वैभव बोंदगुलवार, अक्षद संदीप निकूडे .

वर्ग १०वा कु अनुष्का भाऊराव साखरकर ,भाग्यवान तुळशीराम डोंगरे, श्रद्धा संदीप नन्नावरे, वर्ग१२वा कु तृप्ती बंडू नन्नावरे.व विषयात प्रथम आलेले श्रुती भारत उताणे ,खुशी विकास नवघरे ,पवन सुरेश कायरकर ,अमर ईश्वर घोडमारे = विशेष सत्कारमूर्ती यशस्वी युवा युद्योजक मा श्री प्रवीण बोंदगुलवार , कु करिष्मा निखारे( एम पी एस सी) आदिवासी समाज कल्याण अधिकारी,कु. काजल साळवे नागपूर विद्यापीठ प्रथम एम एस सी बायोकेमिस्ट्री ,निखिल आत्राम चित्रकला/गोंड लिपी संशोधक या सर्व व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष विनोद चिकटे सर यांनी सूत्र संचालन सचिव भालचंद्र लोडे सरांनी केले व आभार प्रदर्शन ईश्वर नरड यांनी केले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रबोधन मंडळाचे सदस्य गण मा श्री मानकर सर, डॉ प्रमोद बोंदगुलवार,निलेश लोडे ,देवरावजी साखरकर,सुधीर चिकटे सर,भारत नरड,डॉ गॅम्पावार साहेब,मनोज बोंदगुलवार,रुपेश फुटाणे,चंदुजी वाटकर ,राकेश कोटकर,वसंत निखाडे ,धर्मराज लोडे , विशाल कोटकर, प्रभाकर साळवे सर्व सदस्य उपस्थित होते.

Share News

More From Author

चंद्रपूर जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा 

आठ दिवसांपूर्वी नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *