खेमजई येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28 जुलै) :- 

स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या खेमजई येथे आज डोळे तपासणी तसेच चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला यात वृध्द तरुण नव युवक युवती यांनी या शिबिराचा फार मोठा लाभ घेतला.

चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन मौजा खेमजई येथे दिनांक २८ जुलै २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते.

 या शिबीराला खेमजई, पोहा, बोरगाव, नांद्रा, भटाळा, कोटबाळा, शेगाव या गावातील ४००नागरीकांनी भर पावसातही उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपन करुन झाली.

 या कार्यक्रमाचे उदघाटन डाॅ. प्रमोद गंपावार यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन कन्हैयालाल जयस्वाल माजी सभापती जि.प.चंद्रपूर, खेमजई येथिल सरपंच मनिषा चौधरी,उपसरपंच चंद्रहास मोरे,माजी सरपंच संभाजी बावणे भटाळा,अरविंद झाडे,अॅड.अरविंद पेटकर, विश्वनाथ तुराणकर पोलीस खेमजई, माया झाडे सरपंच पोहा, किशोर डुकरे,सामाजीक कार्यकर्ता आसाळा हे मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक सुधाकर खरवडे. संचालन रमेश चौधरी,आभार प्रदर्शन चंद्रशेखर झाडे यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय चंद्रपूरची सर्व टिम व संदिप सोनेकर, प्रमोद गायकवाड, कामेश कुरेकार विनायक बावणे,धनपाल चौधरी,योगेश कोहळे,रविंद्र रणदिवे,प्रविण तुमसरे,अशोक दडमल,शत्रुघ्न शेरकुरे,भगवंता नन्नावरे,निळकंठ श्रीरामे,रमेश बावणे,ग्राम पंचायत खेमजई,गुरुदेव सेवा मंडळ व खेमजई येथिल ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले.

Share News

More From Author

काँग्रेसच्या खोटारडेपणाला जनता उत्तर देईल

चारगाव धरणाच्या पुराच्या पाण्यात वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *