आनंदवन जि प शाळेला शिक्षण उपसंचालकांची भेट

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27 जुलै) :- आनंदवनातील पंतप्रधान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला शिक्षण नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी 27 जुलैला आकस्मिक भेट दिली.या भेटीत त्यांनी शाळेत आत्तापर्यंत झालेल्या शिक्षण सप्ताह मधील उपक्रमाविषयी आढावा घेतला. तसेच कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांना मार्गदर्शनही केले.

     यावेळी त्यांचे सोबत नागपूर विभागाचे शिक्षण सहसंचालक दिपेंद्र लोखंडे, वर्धा येथील माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मनीषा भडंग यांनी सुद्धा शाळेची भेट दिली व शाळेबद्दल माहिती जाणून घेतली. 

        यावेळी वरोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर सहारे तसेच खांबाडा भाग विस्तार अधिकारी श्वेता लांडे उपस्थित होत्या.

Share News

More From Author

मधु तारा फाउंडेशनच्या वतीने पुण्यात भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

भद्रावती तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *