भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव करण देवतळे यांच्या नेतृत्वात युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश

Share News

✒️ शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि .27 जुलै) :- भारतीय जनता पक्ष्याच्या विचारधारेला अनुसरून , भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला आत्मसात करत वरोरा तालुक्यातील राळेगाव गट ग्रामपंचायत चे सरपंच श्री पुंडलिक जी नन्नावरे तसेच आकोला, राळेगाव,पारडी येथील युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री करण देवतळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय आनंदवन चौक वरोरा येथे प्रवेश घेण्यात आला.

यावेळी श्री शुभम बारेकर,प्रफुल भोबडे,विलास मेश्राम, राहुल भुते,प्रवीन झाड़े, महेंद्र घोरुडे, नितेश जुनघरे,गुलाब आत्राम,शालिक बोधाने, सुरज डाऊले या युवकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री. करणभाऊ देवतळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्री संजयजी राम,भारतीय जनता पक्षाचे युवा नेते श्री. खुशालजी बावणे आदित्य जुनघरे,सूरज येरणे इत्यादी उपस्थित होते.

Share News

More From Author

सरिता मालू यांनी आर्थिक दुर्बल अपघातग्रस्त रुग्णाला केली आर्थिक मदत

शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांना पितृशोक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *