शिक्षकाचा अपघातात मृत्यू

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1 जुलै) :- सावली येथील चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील बसस्थानक चौकात वर आज झालेल्या ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुचाकी स्वार शिक्षक निळकठं शेडमाके शिक्षक यांचा जागीच मृत्यू झाला.

चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या सिमेंट च्या ट्रकने शेडमाके यांना धडक दिली.आणि शेडमाके हे जागीच कोसळले व त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.लगेच त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र उपचार करीत असतानाच त्या ठिकाणी शेडमाके शिक्षक यांचा मृत्यू झाला. असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले .

मृतक नीलखंठ शेडमाके हे सावली तालुक्यातील कढोली येथे आश्रम शाळेत शिक्षक होते .त्यांची मूळ वस्ती ही तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील आहे. 15 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद ची निवडणूकही लढलेली होती.त्यांच्या मृत्यू ने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

Share News

More From Author

बापरे….आरोपीने घेतला पोलीस कस्टडीत गळफास

एल टीवी कन्या प्राथमिक स्कूल मे सहित वितरण किया गया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *