शेगाव परिसरात डेंग्यू तसेच विविध आजाराची लागण

🔹शेगाव येथील प्रा.आ.केंद्राची इमारत फक्त दिखाव्यासाठीच

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू(दि.10 जुलै) :- 

           स्थानिक शेगाव परिसरात सध्याच्या परिस्थितीत पहाले असता तर अनेक गावं खेड्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण तसेच हगवण ताप असे अनेक रोगाचे रुग्ण दररोज शेगाव येथील खाजगी रुग्णालयात पाहायला मिळत आहे तर चारगाव खुर्द येथे तीन डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यात एकाचा शेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर दुसरा वरोरा येथे तिसरा चंद्रपूर येथे उपचार घेत आहे याच सोबत बेंबळा येथे सहा दिवसा पूर्वी या गावात देखील डेंग्यूचे चार रुग्ण आढळले ते सुद्धा उपचार करिता वरोरा चंद्रपूर येथे बरे झाले असल्याची माहिती मिळाली.

विशेष म्हणजे शेगाव बू हे वरोरा तालुक्यात सर्वात मोठे गाव आहे या गावाशी अनेक गावं खेडे जुळलेले आहे या खेड्यातील नागरिकांना शिक्षण आरोग्य जीवनावश्यक वस्तू ची खरेदी विक्री करण्यासाठी शेगाव येथेच यावे लागते . परंतु सद्या परिस्थीचा विचार लक्षात घेता आरोग्य उपचार करिता शेगाव येथे येत असतात अनेक दवाखाने रुग्णाने भरलेले दिसत आहे या गोर गरीबाच्या खिशाला कात्री लागत असून गोर गरीब, शेत मजूर ,शेतकरी बांधव यांना दवाखान्यात उपचार करिता जाता जाता दिवाळं निघत आहे तर डॉक्टर लोकांची चांदी होत आहे .

      गरीब जनतेचा अखेर वाली कोण ? असा प्रश्न नागरीक करू लागले आहेत . सत्ता हाती येण्या पूर्वी अनेक पुढारी नेते आम्ही तुमच्या साठी हे करू – आम्ही तुमच्या ते करू असे खोटे नाटे आश्वासन देत नागरिकांची दिशाभूल करून . नागरिकांच्या मनाशी खेळून त्यांचा विश्वासघात करतात. आज शेगाव परिसरात प्राणघातक आजारचे थैमान असून काही नागरिक उपचार घेत आहे तर काही उपचार अभावी मरणागती जात आहे .

स्वतःला मी पुढारी समजणारे व सत्ताधारी असलेले नेते आज गप्प का ? त्यांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेता गावो गावात रुग्णासाठी मोफत आरोग्य सेवा का मिळत नाही ? गावोगावी आरोग्य शिबीर का राबवित नाहीत ? का गोर गरीब जनतेला पैसा खर्ची करण्यास भाग पाडतात. अश्या अनेक प्रश्नाने ग्रासलेल्या नागरिकांच्या समस्या कोण सोडविणार की सोडविणारच नाही. की त्यांच्या जीवाशी खेळ खंडोबा करून मरणागती पाठवणार. अश्या गंभीर समस्यांकडे येथील नव निर्वाचित खासदार , जिल्ह्याचे पालकमंत्री, यांचे दुर्लक्ष का असा सवाल यावेळी येथील युवा कार्यकर्ते श्री अभिजीत पावडे व ओंकार लोडे यांनी केला आहे.  

          स्थानिक शेगाव बूज.येथे सार्वजनिक आरोग्य विभाग ,महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर , आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्य परम धरम नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव बु.ता.वरोरा इमारतीचे उद्घाटन लोकार्पण सोहळा निवडणुकीच्या एन तोंडावर मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहाने नवं निर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडला होता . चार ते पाच महिने लोटून देखील शासनाचे करोडो रुपये खरची होऊन देखील ही इमारत धूळ खात आहे तर दारू पिणाऱ्या करिता दारूचा अड्डा बनला आहे. 

      करिता करोडो रुपये खर्ची झालेल्या इमारतीचा योग्य वापर होण्याकरिता या इमारतीमध्ये तात्काळ सर्वस्वी आरोग्यसेवा तसेच रुग्णवाहिका सेवा तात्काळ शेगाव परिसरातील नागरिकांना तसेच रुग्णांना देण्यात यावी . जेणेकरून येथील गोरगरीब जनतेला रुग्णाला आरोग्याचा लाभ होईल तसेच आरोग्यसेवा 24 तास सुरळीत मिळेल व जनतेचा पैसाही वाचेल व याच सोबत नागरिकांची जीवित हानी देखील टळेल. तेव्हा या गंभीर समस्या कडे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नवनिर्वाचित खासदार व संबंधित पदाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊ नवीन इमारती मध्ये आरोग्य सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील युवा कार्यकर्ते अभिजीत पावडे तसेच ओमकार लोडे यांनी केली आहे.