वाढदिवसा निमित्याने रक्तदान शिबिर व कार्यकारणी समिती गठीत

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.6 जुलै) :- मा. नामदार बच्चूभाऊ कडु राज्यमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे प्रहार जन शक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री शेरखान पठाण यांच्या संयुक्त वाढ दिवसा निमित्याने रमदेगी सोनेगाव येथील गुरुदेव सेवा मंडळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .यात अनेक युवकांनी आपले सहकार्य दर्शवून रक्तदान केले .

रक्तदान करणाऱ्या युवकांना यावेळी टीशर्ट , चाय बिस्कीट , फळ , तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. व सर्व रक्तदान करणाऱ्या युवकांचे मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान विषयी संपूर्ण नागरिकांना माहिती देण्यात आली . जेणे करून पुढील भविष्यात सर्व नव युवकांनी रक्तदन केलेच पाहिजे.. यावर अमन ब्लड बँक नागपूर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आपले मत व्यक्त करून युवकांना जागरूक केले. मा. ना. राज्यमंत्री श्री बच्चूभाऊ कडु व शेगाव बू येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री शेरखान पठाण यांच्या संयुक्त वाढ दिवसा निमित्याने केक कापून वाढ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. 

                याचेच ओचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्ष फायर वाचर व वनमजूर कामगार संघटना समिती स्थापन करण्यात आली .यात अध्यक्ष म्हणून शेरखान पठाण यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून सुधाकर मंसरम गायकवाड, सचिव म्हणून विजय माधव आत्राम , कोषाध्यक्ष सुधीर मेश्राम , वनमजूर निरीक्षक अजय जुमडे , फायर वाचर निरीक्षक काशिनाथ चौधरी , सदस्य म्हणून संतोष नामदेव देवतळे, वसंता दामाजी भोयर रोशन रायबान ननावरे, प्रशांत मंगलदास चौधरी तुलसीदास डोमा कोयचाळे गणेश खांडेकर इत्यादींचे सदस्य पदी निवड करण्यात आली सदर ही निवड सर्व नागरिकांच्या मते सर्वानुमते ही संघटना प्रहार जनशक्ती पक्ष चे जिल्हाप्रमुख श्री शेरखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली .