चंद्रपूर शहरातील पाणी समस्येच्या निराकरणा करिता शासनाचे प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित

🔸धानोरा बॅरेज प्रकल्पाशिवाय चंद्रपूरकरांची पाण्याची समस्या सुटूच शकत नाही

🔹पा.पु.सं समितीची आर्त हाक

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.4 जुलै) :-

चंद्रपूर–गडचिरोली जिल्हा पाणीपुरवठा संघर्ष समितीने जिल्ह्यातील विविध भागातील पाण्याच्या समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता युद्ध स्तरावर सरदार हरविंदरसिंह धुन्नाजी यांच्या अध्यक्षतेखाली लढा उभारला असून शासनाकडून चंद्रपूर शहराकरिता केलेले २४० अधिक २७० कोटींचे नियोजन अर्थहीन असून यात झालेला व होत असलेल्या गैरप्रकाराकडे वेळोवेळी नामदार, आमदार, खासदारांचे लक्ष वेधूनही योजनेचा पहिला टप्पा ही पूर्ण झाला नसताना पाणी कर  जबरन वसुलीचे नोटीस दिला जात आहे. 

चंद्रपूरची पाणी पुरवठा योजना म्हणजे “पहिले अंडे की कोंबडी” यापेक्षाही वाईट गत आहे. शहराच्या रस्त्यांची दुर्दशा करून फक्त पहिला टप्पा पूर्ण झाल्याचा वाव आणणाऱ्या मनपाची सहभागीदार म्हणणे अतिशोक्ती होणार नाही. यात मजिप्रा कडे कामाची गुणवत्ता पाहणे, एम. बी. रेकॉर्ड करणे, काल मर्यादेत व दर्जेदार काम करून घेणे ही संपूर्ण जबाबदारी त्यांचीच अशे मनपाचे म्हणणे आहे. तर माजिप्रा म्हणते की आमच्या एवढे मनपाही यात प्रत्येक कार्यपूर्तीत बरोबरीचे भागीदारी आहेत. पाणीपुरवठा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी न. पा.पाणी पुरवठा सभापती सरदार हरविंदरसिंह धुन्नाजी यांनी या योजनेतील दोष, तांत्रिक चुका, गैरप्रकार याबद्दल अनेक तपापासून पत्राचार व आंदोलने करून फक्त आश्वासनेच मिळाली होती.

दि. १ जुलै २०२४ दुपारी १२:३० वाजता राज्यपालांकडे निवेदन प्रेषित करून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे सोबत ठरलेल्या वेळेप्रमाणे चर्चा झाली असता, त्यांनी ठामपणे ही योजना अजून पूर्ण झाली नसून काही टक्के काम बाकी असून काही त्रूट्या राहिल्या असतील हे न नाकारता मान्य केले. पूर्वीपासून संघटना धानोरा बॅरेज प्रकल्पाकरिता सतत पाठपुरावा करीत असून अनेक पक्षाचे सरकार आले व गेले.

पण या मूळ मुद्द्यांकडे लक्ष न देता गैरकायदेशीर शहराच्या ओपनस्पेस वर पाण्याच्या टाक्या उभारण्याचे कृत्य मजीप्रा व मनपाने चालवून घेतले असून परिणामतः पाहिजे तेवढे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध झाल्याशिवाय या पाईपलाईन व टाक्या कोणत्याही उपयोगाच्या नाही. फक्त यात झाले तर जे–जे अधिकारी निवृत्त होत आहे व होतील जे नेते यात सहभागी आहेत व होतील त्यांच्या टाक्या भरल्या असतील हे ठासून बोलण्याची वेळ आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यात हजारो कोटी रुपये इतर कामांवर खर्च घालविल्या गेले. त्यातून जर या पाचशे कोटीत पुन्हा पंधराशे कोटी टाकले असते तर धानोरा बॅरेज प्रकल्पास चालना मिळून शहरातील पाण्याची समस्या येणाऱ्या अनेक वर्षासाठी निकाली निघाली असती.

या विषयाला अनुसरून जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, नामदारांना निवेदन दिले असता फक्त चंद्रपूरचे आमदार मा. किशोर जोरगेवार यांनी हा विषय विधानसभेत उचलून धरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून चंद्रपूरकर आता तुमच्या बातांना बळी न पळता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या म्हणीप्रमाणे पाण्याच्या टाकीच्या निर्मितीचे नियम निकष दाखवावे व धानोरा बॅरेज प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून द्यावे.

अन्यथा आपला नाकारतेपणा स्वीकारून यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन पुकारनार असल्याचे शासनाकडे पाठविलेल्या निवेदनात स्पष्ट केले असून, 14 ऑगस्ट पूर्वी शासन प्रशासनाने दखल न घेतल्यास पत्रकार परिषद घेऊन पुढील पाऊल कोणते हे जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.