10 महिन्याच्या बाळाला विष देऊन आईने संपवली आपली जीवनयात्रा

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.29 जून) :- स्थानिक शेगाव बू येथे काल दी 28 तारीख रोज शुक्रवरला सायंकाळच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या आईने आपल्या चिमुकल्या बाळाला विष देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली . सविस्तर असे की येथील कृषी केंद्राचे संचालक श्री मितेश किशोर पारोधे यांची पत्नी पल्लवी मितेश परोधे या महिलेने स्वतःच्या मुलाला विष देऊन स्वतः गळफास लावून घेतला व आपली जीवन यात्रा संपवली . मृतक पल्लवी ही मारेगाव जिल्हा यवतमाळ येथील असून पल्लवी व मितेश यांचा विवाह मोठ्या थाटामाटात मारेगावं येथे संपन्न झाला होता . विवाहाला दोन वर्ष लोटून सुखी संसार सुरू होता पण दरम्यान यात एक चिमुकला स्मित देखील त्यांच्या जीवनाला आला.

त्यामुळे त्यांच्या या सुखी संसारात अधिक आनंदायी वातावरण होते . परंतु फिर्यादी तसेच दिलेल्या तक्रारी वरून पारोधे कुटुंब हे वारंवार माझ्या मुलीला पैशाची मागणी करीत होते असे मृतक पल्लवी हिच्या आई वडील तसेच नातलग यांनी तक्रारीत दिले आहे पारोधें कुटुंब सतत पैश्याची मागणी करीत होते हे मृतक पल्लवी हिने आपल्या वडिलांना सांगितले होते मुलीचे सुखी कुटुंब मुलीला शांत करून समजूत काढत होते परंतु परोधें कुटुंब पल्लाविला शारीरिक त्रास तसेच मानसिक त्रास देत होते असे मृतक पल्लवी ने आधीच सांगितले होते त्यामुळे आज झालेली घटना माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून यांच्या मानसिक त्रासापोटी माझ्या मुलीने टोकाचे पाऊण उचलले असे सांगितले.

विशेष म्हणजे मितेश व मृतक पल्लवी व चिमुकला मुलगा स्मित हे तिघे सायंकाळल चार वाजताच्या सुमारास एका सोने चांदी च्या दुकानात गेले होते व दोघे मिळून स्मित च्या कानात असलेले बारे काढून घेतले होते तेव्हा दोघेही आनंदी असल्याचे नागरिकांनी सांगितले . त्या नंतर सायंकाळ पाच सहा च्या सुमारास आपल्या राहते घरी आपल्या चिमुकल्या बाळाला विष देऊन झोपवून ठेवले व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना उघडकीस येताच गावात अवक्याचे आश्चर्य चे वातावरण पसरले ही माहिती खरी होताच स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव येथील ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांनी घटना स्थळ गाठले .

तसेच याची माहिती पल्लावीच्या आई वडिलांना दिली असता .जो पर्यंत आम्ही हजर होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही असे सांगितले . तिचे आई वडील नातलग रात्रौ हजर होताच माझ्या मुलीने जीव दिला नाही यांनी जीव घेतला असा आरोप त्यांनी केले तेव्हा फिर्यादी च्या तक्रारी वरून ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांनी मृत देह ताब्यात घेतला शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा इथे हलविण्यात आला व स्मित चिमुकला याला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करिता हलविण्यात आले आता त्याची प्रकृती सुदृढ बरी असल्याची माहिती मिळाली .

यात आरोपी मितेश किशोर पारोधे वय 32 वर्ष राहणार शेगाव बू. नवरा , किशोर पारोधे वय 63 वर्ष राहणार शेगाव बूज. सासरा , सीमा किशोर पारोधे वय 56 वर्ष राहणार शेगाव बूज. सासू., रितेश किशोर पारोधे वय 26 वर्ष राहणार शेगाव बूज. देर , या चौघांवर गुन्हा ipc 304 ब नुसार हुंडाबळी कायद्या नुसार कारवाई करण्यात आली शिवाय मितेश पारोधे नवरा व रितेश पारोधे दिर या दोघांना अटक करण्यात आली. सदर ही कारवाई येथील ठाणेदार श्री योगेंदर सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

Share News

More From Author

छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प….ना. सुधीर मुनगंटीवार 

कार व ट्रेलरच्या धडकेत एक रेल्वे मजूर ठार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *