शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे थकीत वीज बिल माफ व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान 

Share News

🔸किशोर टोंगे यांच्या मागणीला यश

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि .28 जून):- 

          राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी संकटाबरोबरच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतो. या वर्षी देखील विदर्भातील शेतकऱ्यांना सोयाबीनची नापिकी झाली असून त्यासोबत कापूस, धान,इ. मालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली होती.

आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता कृषीपंपाचे वीज बिल अनेक शेतकऱ्यांना हजारोच्या घरात आलेली आहेत. आधीच शेतकरी हवालदिल झाला असताना त्याची पूर्ण वीज बिल भरण्याची परिस्थिती नव्हती.

त्यामुळे शासन स्तरावर आढावा घेऊन ते कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

तसेच शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी किशोर टोंगे यांनी आंदोलन केले होते व वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता.

 या दोन्ही मागण्या आज अर्थसंकल्पात पूर्ण झाल्यात याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणी साठी दोन ते तीन वर्षापासून अर्ज केलेले आहेत, डिमांड देखील भरलेले आहेत मात्र अद्याप त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. त्यांना तात्काळ वीज जोडणी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली व या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने महायुती सरकारचे आभार मानले.

Share News

More From Author

कपाशीच्या पिकावर तन नाशक फवारून केले शेतकऱ्याचे नुकसान

समाजातील सर्व घटकांना चालना देणारा अर्थसंकल्‍प …डॉ. मंगेश गुलवाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *