भरधाव हायवा ट्रकची पिकअपला धडक

Share News

🔸मजुराचा बळी,गावकरी संतापले 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.27 जून) :- सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने त्याच कंपनीतील एका मजुराचा बळी घेतला.ही भीषण घटना काल (दि.२५) आक्सापूरलगत एक किमी अंतरावर घडली.किशोर चक्रधर गोरंतवार (वय ४३, रा. पोंभुर्णा) असे मृतकाचे नाव आहे.दरम्यान अपघाताच्या घटना सतत वाढत असताना कंपनीकडून काणाडोळा होत आहे.त्यामुळे संतप्त नागरिकांनी कंपनीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.अशावेळी आज (दि.२६) आंदोलन होणार होते.मात्र दिवसभरात कुठलीच हालचाल दिसून आली नाही.

केळझरवरून लोहखनिज खाली करून आक्सापूरकडे येत होता.दरम्यान याच मार्गावर कंपनीचे पिकअप वाहन पंक्चर झाले.या पिकअपमधील किशोर गोरंतवार व अन्य एक मजूर पंक्चर दुरुस्त करीत होते.या उभ्या पिकअपला हायवाने धडक दिल्याने दोघे जखमी झाले.यातील किशोर गोरंतवार याला जबर मार लागल्याने चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले.

मात्र, उपचारादरम्यान दुपारी ३: ३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी कंपनीविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला.कंपनीच्या मजुराचा बळी जाऊनही अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला होता.परंतू आज (दि.२६) दिवसभरात कुठलेच आंदोलन घडून आले नाही.

Share News

More From Author

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले ना. सुधीर मुनगंटीवार

राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *