नीरजा काव्य सरळ रसिकांच्या मनात शिरते अध्यक्ष….डॉ यादव गावळे

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.25 जून) :-

नीरजा समूह म.राज्य आयोजित ‘ राज्यस्तरीय नीरजा पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रीतांचे कवी संमेलन दिशा एज्यू पॉईंट वरोरा येथे संपन्न झाले.अध्यक्ष मा.डॉ. यादव गावळे, उद्घाटक मा.डॉ. हेमचंद कन्नाके (जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी,चंद्रपूर) अतिथी मा. ना. गो थूटे (वरोरा) मा. प्रविण आळेकर (भद्रावती) मा. श्री. गणेश पावडे (डायरेक्टर दिशा एज्यू पॉईंट वरोरा ) प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या दिप प्रज्वलनाने झाले. प्रास्ताविक भाषणात नीरजा समूह प्रशासक नरेन्द्र कन्नाके यांनी 2017 पासून अविरत सुरू असलेले नीरजा समूह व विविध उपक्रम यावर प्रकाश टाकला. कविसंमेलन मुळे जगण्यात विविधता व नावीन्यपूर्ण जीवन होते.

कवितेचे अनेक प्रकार असताना सुध्दा अक्षर गणा मधे नीरजा काव्य प्रकार अर्थपूर्ण असून कमी कालवधीत महाराष्ट्र मधे प्रचलित झाला. हे विशेष असे भाष्य अध्यक्ष डॉ. यादव गावळे यांनी व्यक्त केले. कवीच्या अंतकरणातून निघणारी अलंकारिक शब्दरचना म्हणजे कविता असे उद्घाटक डॉ. हेमचंद कन्नाके यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी मा. प्रविण आळेकर यांनी साहित्यिक विषयावर वेगवेगळे उदा. च्या माध्यमातून आपले भाव स्पष्ट केले. आधुकनिक युगात चांगले संस्कार घडविण्यासाठी पुस्तकाची गरज आहे.

अध्यक्ष डॉ. यादव गावळे यांनी वेगवेगळे काव्य प्रकार जरी असले तरी कवितेत अर्थ असणे आवश्यक आहे. नीरजा काव्य प्रकार गेल्या 7 वर्षात यशाच्या उंच शिखरावर पोहचले आहे तेव्हाच कुठे महाराष्ट्रातील नामवंत कवी संमेलनात प्रामुख्याने सहभागी होऊन साहित्याची सीमा वाढविताना दिसून येत आहे. पहिल्या सत्राचे सूत्र संचालन मा.सौ. नंदिनी कन्नाके (कवी.वरोरा) यांनी आपल्या वेगळ्या शैलीने रंगविले.

       दुसरे सत्र निमंत्रित कवींचे कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.कवी संमेलनाध्यक्ष मा.डॉ. यादव गावळे (बुऱ्हाणपूर) यांनी सर्व मान्यवर कवींच्या कविता अर्थपूर्ण व सुंदर होत्या. कवी हा समाजाचा प्रेरक आहे. आयुष्य उज्वल करण्याचे काम कविता करीत असते. सूत्रसंचालन मा. मंगेश जनबंधु (कवी.ब्रम्हपुरी) यांनी सुमधुर आवाजात कविता,गजल,चारोळी गुंफत कवींना एका माळेत बांधून ठेवले.

यात प्रामुख्याने सौ. राजश्री विरुळकर (हिंगणघाट), मा. गजानन माध्यसवार, मा. धनंजय साळवे, नरेशकुमार बोरीकर,बी. सी. नगराळे, गोपाल शिरपूरकर, धर्मेंद्र कन्नाके, नागसेन सहारे, उज्वला नगराळे (चंद्रपूर), मा. प्रब्रमानंद मडावी(मुल), मा.संजय येरणे (नागभिड), मा. महेश्वरी आवारी , मा. रजनी पोयाम(वणी) , मा. सुरेश डांगे (चिमूर), डॉ.ज्ञानेश्वर हटवार, मा. प्रवीण आडेकर, मा. अनिल पिट्टवार, मा. प्रकाश पिंपळकर(भद्रावती),सौ. नंदिनी कन्नाके, मा. नीरज आत्राम, मा. गणेश पेंदोर, वंदना मेश्राम, परमानंद तिराणिक, गोविंद बोकडे, (वरोरा) या सर्वांनी उत्कृष्ट रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. अशा प्रकारे कवी संमेलन रंगतदार व बहारदार झाले. आयोजक

नरेन्द्र गुरुदास कन्नाके

म.राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share News

More From Author

वाळू विषयक धोरण अतिशय संवेदनशीलपणे आणि गांभिर्याने राबवा

ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीचे निराकरण करा …जिल्हाधिकारी विनय गौडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *