विद्युत स्मार्ट मीटर लावण्याविरोधात आपचे जिल्ह्याभर आंदोलन

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.10 जून) :- आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा यांच्या वतीने, विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास विरोध करण्यासाठी बुधवार दि. 12 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महावितरणच्या तालुका स्तरावरील कार्यालयात तसेच जिल्हा स्तरावरील बाबूपेठ येथील मुख्य कार्यालयात आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. हे आंदोलन जिल्हा व तालुका स्तरावरील आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येईल.

आम आदमी पार्टीच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटरची किंमत वाजवी नसून त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर अनावश्यक आर्थिक बोजा पडणार आहे. प्री-पेड मीटरमुळे वीज रिचार्ज संपल्यास ताबडतोब वीज पुरवठा खंडित होईल. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागेल.

यासोबतच अनेक उद्योग गटांना अनावश्यक फायदा मिळणार आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरची सक्ती विरोधात हे आंदोलन केले जात आहे.

आंदोलनाचे स्वरूप शांततामय असेल. परंतु आवश्यकता भासल्यास आंदोलनाचे स्वरूप बदलण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

जिल्हावासीयांनी उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यानी केले आहे.

Share News

More From Author

रिचार्ज मीटर रद्द करा, उलगुलान संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

प्रहार जनशक्ती पक्षाने पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *