चिमुरात ११ जुन रोजी पत्रकारांचे गुणवंत पाल्यांचा जिल्हास्तरीय अभिनंदन सोहळा आयोजीत

Share News

🔹शैक्षणिक साहित्य वितरण व आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिर

 ✒️सुयोग सुरेश डांगे चिमूर (Chumur विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०)

चिमुर(दि.6 जून) : – व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा व चिमुर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांचे गुणवंत पाल्यांचा जिल्हास्तरीय अभिनंदन सोहळा दिनांक ११ जुन रोजी श्रीहरी बालाजी देवस्थान सभागृह चिमुर येथे आयोजीत केला असुन यावेळी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात पत्रकारांचे कुटुंबियांचे आयुष्यमान कार्ड नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्रीहरी सातपुते यांनी दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मिडीयाचे राज्य संघटक जेष्ठ पत्रकार सुनिल कुहीकर राहणार असुन यावेळी विशेष अतिथी म्हणुन आमदार किर्तीकुमार भांगडीया, जिल्हा पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, चिमुरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणुन तहसिलदार श्रीधर राजमाने, पोलीस निरीक्षक संतोष बाकल, चिमुर न. प. च्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, व्हॉईस ऑफ मिडीयाच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, श्रीहरी बालाजी देवस्थान चिमुरचे अध्यक्ष निलमभाऊ राचलवार यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन व्हॉईस ऑफ मिडीया जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, चिमुर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, तालुका सचिव भरत बंडे, व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे आदीने केले आहे.

Share News

More From Author

ST वर्कशॉप चौक येथे होणाऱ्या अपघात रोकण्याकरिता गतिरोधकांची आपच्या योगेश गोखरे यांची मागणी

यंग थिंकर्स फाउंडेशन, चंद्रपुर द्वारा पर्यावरण दिवस मनाया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *