आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळा

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर.(दि.1 जून) :- 

स्वतंत्र प्राप्तीच्या नंतर आज पर्यंत कोणत्याही पक्षाच्या सरकारला जमले नाही ते आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय श्री अरविंद जी केजरीवाल यांनी अवघ्या कमी कालावधीत करून दाखवलेले आहे .

दिल्ली पाठोपाठ पंजाब या राज्यांमध्ये मोफत वीज, पाणी, शिक्षा, आरोग्य, महिलांकरिता बस सेवा पाठोपाठ महिला सुरक्षा, भ्रष्टाचाराला अंकुश लावणे, प्रदूषण नियंत्रित करण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट वर भर देणे, देशात तसेच जगात सर्वाधिक इलेक्ट्रिक्ट बसेस चे शहर म्हणून दिल्ली ला मान मिळवून देणे. शहिदांना १ करोड सन्मान राशी देने, कोविड काळात सेवा देणाऱ्या आरोग्य विभागाच्या शहिदांना प्रत्येकी १ करोड सन्मान राशी देणे, देशात कामगारांना सर्वात जास्त किमान वेतन देण्याचा मान मिळवून देणे, कंत्राटी पद्धती पूर्णपणे बंद करून कंत्राटी कामगारांना पर्मनंट करण्यावर भर देणे, भ्रष्ट्राचारावर कडक अंमलबजावनी करत स्वतःचा कॅबिनेट मंत्री ला पदावरून तथा पक्षातून हाकलपटी करणे.

इत्यादी कामाला प्रेरित होऊन पंजाब नंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम आदमी पार्टीकडे जनतेचा कौल वाढताना दिसत आहे. आत्ताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या विरोधात जनतेची सहानभूती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला. अनेकांनी पक्षामध्ये जुळण्याकरिता इच्छा व्यक्त केली.

Share News

More From Author

ओबीसीतील घुसखोरी खपवून घेणार नाही : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *