समाजातील सर्व घटकांना चालना देणारा अर्थसंकल्‍प …डॉ. मंगेश गुलवाडे

🔸हा शेतक-यांचा अर्थसंकल्‍प,हा माता भगिनीचा अर्थसंकल्‍प

🔹हा नोकरदारांचा अर्थसंकल्‍प,हा सर्वसमावेशक संकल्‍पपूर्तिचा अर्थसंकल्‍प

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.28 जून) :- मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विकसीत भारताच्‍या संकल्‍पनेतुन महाराष्‍ट्राच्‍या संकल्‍पपूर्तिचा अर्थसंकल्‍प आज महायुती सरकारने विधान मंडळात सादर केला. आपल्‍या शेतकरी बांधवासोबतच समाजातील सर्व घटक – महिला, युवती, युवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विधवा, दिव्‍यांग, ज्‍येष्‍ठ नागरिक, नोकरदार व उद्योजक या सर्वांना चालना देणारा स्‍वप्‍नपूर्तीचा अर्थसंकल्‍प आहे.

आज सादर झालेल्‍या अर्थसंकल्‍पातील ‘मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहिण’अंतर्गत महाराष्‍ट्राचतील अडिच कोटी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्‍यांच्‍या खात्‍यात जमा होणारी योजना व माता भगिनी यांना वर्षात ३ सिलेंडर योजना या महत्‍वपूर्ण घोषणेसह सर्व निर्णयासाठी मी महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन करतो.