माढेळी ते धानोरा रस्त्याचे डांबरीकरण ला सुरुवात

🔹शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे यांच्या आंदोलनाला यश 

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.21 जून) :- 

वरोरा तालुक्यातील माढेळी ते धानोरा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे यांनी निवेदन दिले आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचे काम केले.

रस्त्यातील खड्डय़ात झोपा काढा आंदोलन करत त्यांनी झोपलेल्या प्रशासनाला धारेवर धरले. या रस्त्याच्या डांबरीकरण सुरुवात झाली असून अभिजित कुडे यांच्या आंदोलनास यश मिळाले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणी साठी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले शिवाय सतत पाठपुरावा केला त्या नंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील सर्व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

काही रस्त्यांचे डांबरीकरण दुरुस्ती झाली आहे पण अजून खूप रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे लोकाना जीव मुठीत धरून रात्री प्रवास करावा लागतो आहे. तालुक्यातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करावी अशी मागणी आहे. रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते हेच समजणे अवघड झाले आहे.

अनेक निवेदन देवून आंदोलन करण्यात आले तरी देखील प्रशासनाला गांभीर्य लक्षात येत नाही आहे. अनेक अपघात या रस्त्यामुळे घडत आहेत. मोठे मोठे खड्डे पडले आहेत. तालुक्यातील शेगाव, उखर्डा, हीवरा, चिकणी ते महाडोळी ,गीरसावळी या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. तात्काळ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे.