ग्रामीण कृषी कार्यानुभव’ करिता प्रथमच शेगांव(खुर्द) या गावाची निवड

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.19 जून) :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळावी व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होऊन शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता नवनविन आधुनिक प्रयोगात्मक माहिती देण्यासाठी महारोगी सेवा समिती व्दारा संचालित डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाशी संलग्नित ‘आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचेआगमण झाले. यावेळी गावचे सरपंच श्री. मोहित महेंद्र लभाने, ग्रामसेवक श्री. शिरपुरकर, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी कृषीदुतांचे स्वागत केले.

कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर व्ही महाजन, कार्यक्रम समन्वयक, डॉ. आर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली चतुर्थ वर्षातील विद्यार्थी संपूर्ण सत्रातील विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाची व आधुनिक शेती पद्धतीची माहिती सामायिक करतील आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव प्राप्त करतील.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आयोजित या कार्यक्रमामध्ये शेगांव(खुर्द) येथे आगमन झालेल्या कृषीदुतां मध्ये रोहित गलांडे, कुणाल कोहळे, संभव बैद, प्रज्वल चटकी, प्रेम बासेवार, सागर जरे व हर्षल खाटिक यांचा समावेश असून प्रथम च गावात कृषीदुतांचे आगमन झालेले आहे.