ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाज भूषण सत्कार सोहळा

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.17 जून) :- दिनांक 16 जून 2024 रोज रविवारला माना आदिम जमात मंडळ मुंबई तालुका शाखा वरोरा यांच्या वतीने विद्यार्थी व समाजभूषण सोहळा संत तुकडोजी विद्यालय व माध्यामिक व कनिष्ठ महाविद्यालय टेमुर्डा येथे संपन्न झाला .गुणवत विद्यार्थी व जमातीचे बहुसंख्य लोक उपस्थित झाले .

या प्रसंगी माना आदिम जमात मंडळ मुंबई चे मा.श्री. वासुदेवजी धारणे ,श्री. सुर्यकांतजी जीवतोडे ,श्री,शुभाषराव जीवतोडे ,श्री. भाष्करराव गायकवाड ,श्री.केशवराव बारेकर ,श्री.गुणवंतराव दडमल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते .मा.आ.ज.मंडळ तालुखा शाखेचे अध्यक्ष श्री.रामशोकजी दडमल , श्री.यशवंतराव घोडमारे श्री.प्रभाकर वाघ तसेच मा.आ.ज.मंडळ नागपूर शाखेचे कार्याध्यक्ष नरेद्र वाकडे श्री .कृष्णाजी रंदई, समाजभूषण पुरस्कार स्विकारणारे श्री.सुरेशजी गरमडे .प्रा.सुहानद ढोक ,मृणाल दडमल ,आशिष जीवतोडे यांचा सत्कार सोहळा पार पडला .या प्रसंगी इयता १० व १२ वी मधील प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला .एकूण ३५ विद्यार्थ्याना गौरविण्यात आले .

या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री. गुलाब श्रीरामे ,श्री. दादाजी दडमल ,श्री.दागेश श्रीरामे ,श्री.दिनेश धोटे श्री. कौतुभ मगरे श्री. शंकर दडमल सौ.सोनुताई दडमल ,सौ.पार्वताबाई ढोक सौ. सीमाताई घोडमारे यांनी सहकार्य केले . सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. शिरीष दडमल व आभार प्रदर्शन श्री. विनोद खडसंग यांनी केले