अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख

Share News

🔸गंभीर जखमी तरुणाला स्वतःच्या वाहनातून नेत रुग्णालयात केले भरती

🔹शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या समयसूचकतेने वाचले प्राण

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28 मे) :- वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द येथील कृषी केंद्र उद्घाटन आटोपून पुढील कार्यक्रमा करिता वरोराकडे जात असताना सालोरी गावाजवळ चारचाकी व दुचाकीचा झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या बाजूला पडून होता.

यावेळी जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जीवतोडे यांनी समयसूचकता दाखवत त्या तरुणाला स्वतःच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या समयसूचकतेने जखमी तरुणाला जीवनदान मिळाले आहे.

Share News

More From Author

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या बांधकामाची पाहणी

अन् त्या प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *