प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा किशोर टोंगे यांच्या हस्ते सत्कार 

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.24 मे) :-  तालुक्यातील जळका या गावातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा या महाविद्यालयात शिक्षण घेऊन कु.ओम दिवाकर कापसे या विद्यार्थ्यांने वर्ग बारावी मध्ये विज्ञान या शाखेत ९४.८३% मिळवत जिल्ह्यात प्रथम येऊन गावाचं आणि आई वडिलांच नाव उंचावलं आहे त्याने हा गौरव प्राप्त केला अशी माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी चे युवा नेते किशोर दादा टोंगे वरोरा-भद्रावती विधानसभा यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ, पुस्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील शिक्षणात प्रगती कर अश्या शुभेच्छा दिल्या.

वडील दिवाकर कापसे आणि आई निता हे शेती करत करत असून मुलांना चांगलं शिक्षण देण्यात धाडस आई वडिलांना आहे.त्याचे पुढे कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन कृषी क्षेत्रात प्रगती करायची आहे असे सांगितले. त्या वेळी भाजपा चे देवानंद महाजन, राजेंद्र उरकुडे, शुभम आमने उपस्थित होते.

Share News

More From Author

भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने बुद्ध जयंती साजरी

वेकोली गार्ड सोहेल खान का सास्ती आरसी से चोरों द्वारा अपहरण किए जाने की चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *