चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.23 मे) : – चंद्रपूर महानगरपालिका तर्फे नुकतेच शहरातील अतिक्रमण हटविण्याचे काम करण्यात आले. अतिक्रमण हटवले जाणे ही एक सकारात्मक पायरी आहे, परंतु यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. अतिक्रमण केलेल्या ठिकाणी, महानगरपालिका संबंधित व्यक्तींकडून दररोज 10 ते 30 रुपये कर आकारत होते. या कराच्या स्वरूपाने असे सूचित होते की, महानगरपालिका अतिक्रमणाला प्रत्यक्षपने मान्यता देत होती. असे रस्त्यावरील रोजी रोटी करना-यांचे म्हणने आहे.

नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या सुव्यवस्थेसाठी महानगरपालिकेने कडक पावले उचलली पाहिजेत. सोबतच गरीब दुकानदाराच्या रोजी रोटीचा प्रश्न देखील सोडवला पाहिजे.

आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश दे. गोखरे यांनी मनपा आयुक्तांना प्रश्न विचारले आहे की, कर आकारणी करून अतिक्रमणास मान्यता देण्याचे तात्पर्य काय? मनपा आयुक्तांनी नागरिकांच्या हिताचे काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे शहरातील अतिक्रमण काढण्याच्या कामात पारदर्शकता आणि न्यायसंगतता यावी हीच अपेक्षा आहे.

महानगरपालिकेने यापुढे नागरिकांच्या समस्या आणि अडचणी समजून घेत त्यावर कार्यवाही करावी आणि शहरातील सुव्यवस्था आणि स्वच्छता कायम ठेवावी ही आम आदमी पार्टीची मागणी आहे.

Share News

More From Author

कौशल्य प्रशिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास-जिल्हाधिकारी विनय गौडा

भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने बुद्ध जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *