धक्कादायक… तेंदुपत्ता संकलन करताना वाघाचा हल्ला महिला जागीच ठार

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर.(दि.4 मे) :- वनपरिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव बीटात कक्ष क्रमांक 322 मध्ये मौजा बामणीमाल येथील तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या दीपा दिलीप गेडाम या 33 वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघांनी ठार केले. 

    सविस्तर वृत्त असे आज सकाळी तेंदूपाने गोळा करण्यासाठी गेलेल्या दिपाली ही तेंदूपाने गोळा असताना वाघाने हल्ला चढवत ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग व वनकर्मचाऱ्यानी प्रयत्न केले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट क्षेत्रसहाय्यक एस वाय बुले,क्षेत्र सहाय्यक नल्लेश्वर पेंदोर क्षेत्र सहायक शिवनी प्रधान वन रक्षक मडावी , वनरक्षक कोवे, शेख, भारत मडावी , सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर पि आर टी सदस्य हजर होते.

   सदर वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नवर्‍याला ५००००/-रुपये तातडीने आर्थिक मदत देण्यात आली व उर्वरित रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट यांनी सांगितले.

Share News

More From Author

रेतकी चोरी करणे वाला आरोपी गिराफ्तार 

माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल चे शिष्यवृत्ती परिक्षेत नेत्रदीपक यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *