बल्लारपूर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Share News

✒️चंद्रपूर.(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3 मे) :- बल्लारपूर शहरातील विद्या नगर वॉर्ड येथे राहणाऱ्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री ११ वाजता उघडकीस आली.

     मिळालेल्या माहितीनुसार विद्या नगर वॉर्ड येथील राहुल विजयकुमार जैस्वाल वय ४४ वर्ष यांनी आपल्या स्वतःचा घरी स्टोअर रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केले. रात्री त्यांचे भाऊ स्टोअर रूम मध्ये गेले असता त्यांना राहुल गळफास घेऊन दिसला. त्यांनी याची माहिती बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे दिली. लागलीच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले.

    पोलीसांनी मर्ग दाखल केले असून प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार, पोहवा विशाल बेझलवार करीत आहेत.

Share News

More From Author

महागाई वाढल्यामुळे नागरिकांचे हाल भाजप सरकार अपयश 

मुलाचे लग्न आटोपून घराकडे जाताना आईचा अपघातात मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *