अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत रोजगार सेवक कार्यशाळा सपन्न

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .16 मे) :- – वरोरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील 25 ग्रामपंचायतींच्या ग्रामरोजगार सेवकांचे प्रशिक्षण 15/5/2024 ला पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आले.अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत क्षमता बांधणीचे हे एक दिवसीय प्रशिक्षण गटविकास अधिकारी मुंडकर साहेब यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आले, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर,भारत ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पंचायत समिती रोहयो विभागांतर्गत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

 प्रारंभी प्रशिक्षण कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडण्यात आली.कृषी विकास राबवत असलेल्या अतिप्रभावी मेगा पाणलोट प्रकल्पाची वरोरा तालुक्यातील 47 गावांतील उपक्रमांची माहिती देण्यात आली. या प्रकल्प अंतर्गत कृषी व पाणलोट क्षेत्र विकसित होण्यास खूप मोठा हातभार लागणार आहे यात रोजगार सेवक यांची भूमिका महत्वाची असणार आहे त्यासाठी त्यांच्या जबाबदारी व प्रकल्प कार्यप्रणाली विकासाकरिता संजीवनी ठरणार आहे .

भारत ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठानचे जिल्हा समन्वयक सतीश माकोडे सर यांनी यावेळी केली.प्रकल्प च्या कामे,जबाबदारी व प्रकल्प कामाचा स्थर टीम लीडर रोशन मानकर सर यांनी समजून सांगितले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत होणारी कामे ऑनलाइन करता येईल असे बी.आर.एल.एफ. जीबी मेंबर अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी सांगितले,त्यांनी रोजगार सेवक यांच्या मानधन विषयी संपूर्ण माहिती दिली.प्राथमिक टप्प्यात कोणती कामे घेता येईल,तसेच रोजगार सेवकांच्या कोणत्या अडचणी आहेत हेही त्यांनी जाणून घेतले.

त्यानंतर पंचायत समिती तांत्रिक अधिकारी(PTO) मा.कुंभरे सर यांनी सूक्ष्म पाणलोट विकासाचे महत्त्व सांगत यातून उपजीविका कशी निर्माण करता येईल,माथा ते पायथा कामे केल्याने भरपूर फायदे गावाकरी यांना होतील त्याच बरोबर आपल्या गावच्या पाण्याची समस्या पन दुरु होईल याविषयी रोजगार सेवक यांना मार्गदर्शन केले.प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन राऊत सर (तालूका समन्वयक)यांनी केले.

या प्रशिक्षण ला प्रमुख पाहुण्या मा येमरे मॅडम विस्तार अधिकारी(प.स.), उपस्थित होत्या कार्यक्रम चे आभार प्रदर्शन पल्लवी नन्नावरे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीसाठी APO बोगेकर मॅडम,सचिन भैसारे सर, दानवे सर त्याच बरोबर कृषी विकास चे कृषी तज्ञ डोये सर, जलतज्ञ पाटील सर, जुमडे सर, मंगेश तुमसरे,विशाल आडे, गुरूदास चौधरी,अंकुश रामपुरे आचल घोडमारे,माया पोहीणकर नीलिमा वनकर मॅडम उपस्थित होते.