शक्तीचा सदुपयोग केल्यानेच हनुमंत चिरंजीव : सुधीर मुनगंटीवार

Share News

🔸भागवताचार्य मनीष महाराज यांच्यावतीने आयोजित हनुमान जयंती कार्यक्रमात प्रतिपादन

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.25 एप्रिल) : – रावण आणि हनुमान दोघेही शक्तिशाली होते. रावणाने आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला, तर हनुमानाने सदुपयोग केला. त्यामुळे युगानुयुगे लोटल्यानंतर आजही रावणाचे दहनच होत आहे आणि विश्वाच्या कल्याणासाठी आणि रावणाच्या तावडीतून माता सीता यांना मुक्त करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हनुमानाची पूजा होत आहे. आणि त्याच कारणाने हनुमंत चिरंजीव आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुल मार्गावरील चिचपल्ली येथे भागवताचार्य श्री मनीषजी महाराज यांच्या वतीने आयोजित हनुमान जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भागवताचार्य श्री मनीष महाराज, डॉ. तन्मय बिडवाई, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, श्री मधू महाराज उपस्थित होते.

 यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ‘गेल्या वर्षी दिवाळीत आपण चिचपल्ली येथे ६५ फुटाच्या श्री हनुमान मूर्तीला विद्युत रोषणाई करण्याचा शब्द दिला होता. हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर दिलेला शब्द पूर्ण करताना आपल्याला आनंद होत आहे. लवकरच या परिसरातून महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. नव्या महामार्गावरून प्रवास करताना विविध राज्यातील भक्तांना हनुमंताचे दर्शन होईल, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

हनुमान मंदिराच्या परिसरात वेगवेगळी भजने आणि भक्तीगीते ऐकायला मिळतील. त्यामुळे चिचपल्ली भागात कायम भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येईल, असा विश्वास ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मूर्तीच्या रोषणाईच्या लोकार्पणानंतर ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हनुमानाची महाआरती करण्यात आली.

Share News

More From Author

चुनाव खत्म होते ही स्थानीय अपराध शाखा, चंद्रपुर फिर से एक्शन मोड में आ गई है और चंद्रपुर जिले में दो अलग-अलग ऑपरेशनों में 41,27,000/- रुपये जब्त किए हैं

निमढेला तलाव आटल्याने पाळीव प्राण्यासहित वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *