इरई नदीवरील सिमेंटच्या बंधाऱ्याला मातीचा वापर

Share News

🔸इतिहासात पहिल्यांदाच बंधाऱ्याच्या पिचींग भरण्यासाठी मातीचा वापर विनोद उमरे यांच्या कडून या ऐतिहासिक कामांचे कौतुक

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 एप्रिल) :- सावरी येथिल इरई नदीवर सिमेंटचा बंधारा बांधण्यात आला.सन २०२१-२२ मध्ये बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.परतु पहील्या पावसाळ्यात सिमेंटचा बंधारा तुटून गेल्याचे गावकऱ्यांच्या विनोद उमरे यांच्या निदर्शनास आले.नंतर विनोद उमरे यांनी बंधाऱ्याचे बांधकाम करणयाऱ्या कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विनोद उमरे यांनी केली होती.तसेच अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाईची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा बंधाराऱ्याच्या पिचींग भरण्याचे सन २०२५ मध्ये बधाराऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून ते बांधकाम मातीचे आहे .

इतिहासात पहिल्याच असे काम आहे की नदीवर बंधारा बांधण्यासाठी माती वापरत आहे.अस कामांचे स्वागत करायला पाहिजेत.इरई नदीवरील मोठे महापूर येतात व नदीला लहान मोठ्या नदी,नाल्यांचे सुध्दा पाणी येतात त्यामुळे पाण्याची मोठी आवक असते.तशात जर नदीवर जर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले असेल त्यात पिचींग मध्यें माती जर वापरत असेल तर ही इतिहासिक बाब आहे.करण पाण्याची मोठी आवक असता नदीवरील मातीचे बांधकाम कसे काय?टिकेल असा 

 प्रश्न विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.इरई नदीवरील बंधाराऱ्याचे बांधकाम जर निकृष्ट दर्जाचे केले तर तुमची गाठ विनोद उमरे यांच्याशी असे समजा आणि कसल्याही प्रकारचा भष्टाचार खपऊन घेतला जाणार नाही असे विनोद उमरे यांनी खचूक शब्दात सांगितले उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग चिमूर याना निवेदनातून दिला जर भष्टाचार कराल तर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा सुध्दा दिला.

Share News

More From Author

सामान्य कार्यकर्तेची जाण असणारा नेता म्हणून ओळख असलेले लोक प्रतिनिधी विकास पुरुष मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार 

चुनाव खत्म होते ही स्थानीय अपराध शाखा, चंद्रपुर फिर से एक्शन मोड में आ गई है और चंद्रपुर जिले में दो अलग-अलग ऑपरेशनों में 41,27,000/- रुपये जब्त किए हैं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *