मी रडणारी नाही लढणारी भावी खासदार आहे

Share News

🔸शेगाव बू येथे कॉर्नर सभेत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्वाही

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.16 एप्रिल) :- स्थानिक शेगाव बु. येथे आज चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राची लोकप्रिय अधिकृत उमेदवार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांची आज शेगाव येथे भव्य कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती यात अनेक गावातील अनेक महिला पुरुष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अनेक उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते या कॉर्नर सभेमध्ये उपस्थित असलेल्या प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांनी मी रडणारी उमेदवार नसून जनतेच्या लोकहितासाठी लढणारी पुढील भावी उमेदवार आहे तेव्हा माझ्या परिसरात सुरू असलेल्या शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवक यांच्या समस्या लक्षात घेऊन या संपूर्ण समस्या सोडवीण्याकरिता तसेच हुकूमशाही विरुद्ध लोकशाही व संविधान वाचविण्या मी खासदार पदासाठी उभी आहे.

यात माझा स्वार्थ नसून यात गोरगरीब जनतेचा न्याय मिळवून देण्याकरिता त्यांच्यावर होणारे अन्याय कायमस्वरूपी बंद होऊन त्यांना सुद्धा सुख समृद्धीचे दिवस यावे याकरिता उभी असून त्याकरिता मला सर्वाधिक मताने निवडून द्यावे अशी मत त्यांनी शेगाव येथे झालेल्या कॉर्नर सभेमध्ये व्यक्त केले . या सभे करिता गावातील तसेच गाव परिसरातील हजारो उमेदवार उपस्थित होते तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शेगावात प्रवेश करतात फटाके आतिषबाजी तसेच ढोल ताशाच्या गजरात तसेच पुष्पगुच्छ देऊन अनेकांनी त्यांनी स्वागत केले तेव्हा येथील शेगाव वासिय तसेच अनेक नागरिकांचे त्यांच्याविषयी असलेले प्रेम दिसून आले 

        शिवाय खासदार बनले तर शेगाव बू. तसेच या परिसरातील अनेक गावाचा चेहरा मोहरा बंदलवून सुजलाम सुफलाम करेल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन मला भार्गोच मताने निवडून द्यावे अशी विनंती मतदारांसमोर व्यक्त केले . यावेळी श्री राजुभाऊ चिकटे , प्रा. जावेद पाशा.यशवंत लोडे , डॉ. इस्माईल पठाण , कन्हैयालाल जयस्वाल , चंदू जयस्वाल , प्रभाकर घोडमारे , योगेश खामनकर , तसेच गावातील व परिसरातील अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच येथील पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांच्या ताफ्यासह विशेष बंदोबस्त करण्यात आला होता.

Share News

More From Author

उद्योजक , साहित्यिक व समाजसेवक , इंजिनिअर प्रविण उपलेंचवार यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठा तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचा ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *