जन आक्रोश सामाजिक संघटनेचा आवाज संसदेत पोहोचविणार

Share News

🔸लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

🔹वरोरा येथे जन आक्रोश सामाजिक संघटनेचा मेळावा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14 एप्रिल) :- जन आक्रोश सामाजिक संघटना महाराष्ट्र ही चंद्रपूर जिल्ह्यातील पीडित ग्राहक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहे. या संघटनेने आज मला लोकसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे मी या संघटनेचा ऋणी राहील, एवढेच नाही तर देशाच्या संसदेत जन आक्रोश संघटनेचा आवाज पोहोचविणार, अशी ग्वाही चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी दिली.

वरोरा तालुका येथे जन आक्रोश सामाजिक संघटना महाराष्ट्राच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, सर्व समुदायातील वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी व सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. मी शाळेत शिकत असताना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही शिकवण घेतली. परंतु आज जेव्हा जात पाहून मतदान केले जाते तेव्हा अनेक गोष्टी मनाला वेदना देतात. आपण कधी जात पाहून व्यवहार करीत नाही, सार्वजनिक जीवनात जातीला महत्त्व फार कमी दिल्या जाते. जात केवळ ही उंबरठ्याच्या आत बेटी व्यवहारासाठीच तिचा उपयोग केला जातो. परंतु आज काही राजकीय पक्ष केवळ स्वार्थ साधण्यासाठी जनतेची दिशाभूल करीत आहे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

आज चंद्रपूर जिल्ह्याचा एवढा विकास झाला आहे की, सर्व लोक आत्मीयतेने सुंदर शहर म्हणून चंद्रपूरची गणना करतात. चंद्रपूरला देशातील क्रमांक एकची सैनिकी शाळा, वन अकादमी, बांबु संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, कामगारांसाठी १०० बेडचे हॉस्पिटल, बॉटनिकल गार्डन, एसएनडीटी युनिव्हर्सिटी यासारखी कितीतरी विकासकामे करून देशात चंद्रपूरचे नावलौकिक मी केला आहे.

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना समाजातील गोरगरीब वंचित तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची जाणीव आहे. त्यांना सामाजिक भान आहे, त्यामुळे जन आक्रोश सामाजिक संघटना महाराष्ट्र ही या लोकसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देत आहे अशी, घोषणा संघटनेचे अध्यक्ष ॲड. अमोल बावणे केली यावेळी ना. मुनगंटीवार यांनी जन आक्रोश सामाजिक संघटनेच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल,अशी ग्‍वाही दिली. जन आक्रोश सामाजिक संघटनेच्या बैठकीला वडार समाजाचे नेते राजुजी इटकर, अहेतेशाम अली, राजू कक्कड, अमोल गुबळे, कल्पना क्षीरसागर, अतुल दुबे, अजय दुबे, सपना चौधरी यांच्यासह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

Share News

More From Author

कोरपना येते बस्थानक देण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अरुण पा नवले यांनी केली आहे

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित अन् उत्तम भविष्यासाठी सुधीरभाऊंना विजयी करा : सुनील शेट्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *