युवकाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27 मार्च) :- बल्लारपूर मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या युवकांनी वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुळीवंदनाच्या दिवशी उघडकीस आली. सदर युवक नामे मोहम्मद नदीम मोहम्मद नईम असरफी वय १९ वर्ष असून जुनी टीचर कॉलनी बालाजी वार्ड,बल्लारपूर येथील रहिवासी आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार धुळीवंदनच्या दिवशी बल्लारपूर राजुरा मार्गावरील वर्धा नदीत एका युवकाचे शव तरंगताना दिसल्याने वर्धा नदीच्या पुलाजवळील फळ विक्रेते यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे यांनी तत्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी गाठत मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले व कुटुंबीयांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय पाठविण्यात आले.

      सदर युवक मोहम्मद नदीम असरफी हा २३ मार्च पासून रात्री ९ वाजल्यापासून घरी मोबाईल ठेवून बेपत्ता होता. त्याचे वडील मोहम्मद नईम असरफी यांनी २४ मार्च यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविले होते.

     सदर युवकाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून सदर युवकाचे गोंडपिपरी तालुक्यातील एका मुली सोबत प्रेम प्रकरण सुरू होते.त्याच्या घरच्यांनी विरोध केल्यामुळे त्याने आत्महत्या सारखे पाहुल उचविले. 

      पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे.

Share News

More From Author

अवैद्यरित्या रेती उत्खनन वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

अवैध दारू विरोधात उत्पादन शुल्क विभागाची मोठी धडक कारवाई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *