अवैद्यरित्या रेती उत्खनन वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

Share News

🔸पारोधी घाटावर शेगाव पो. ठाणेदार यादव यांची बेधडक कार्यवाई

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.25 मार्च) :- महसुल विभाग रेती तस्करांच्या विरोधात गप्प बसले असताना शेगाव पो. मात्र कारवाईचा सपाटा सुरू केला असून अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर शेगाव पोलिस अंतर्गत येणाऱ्या पारोधी रेती घाटावर रात्रीच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन ट्रॅक्टर शेगाव पोलिसांनी जप्त केले.

 रात्रीच्या दरम्यान गस्त करीत असताना आष्टा पारोधी रेती घाटावर येथे अवैद्य रेती उत्खनन करताना नंबर नसलेले नवीन दोन ट्रॅक्टर आढळून आले असता जप्तीची कारवाई करत रेती भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त करून शेगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले,यामध्ये आरोपी म्हणून ट्रॅक्टर मालक विकास धांडे रा. बोरगाव धांडे, अनिल गायकवाड रा.चंदनखेडा मंगेश शेंडे रा.पारोधी अवैध रेती सहित ट्रॅक्टर टाली व इतर साहित्य सहीत वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा नोंद करून जप्त केल्याची माहिती शेगाव पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार योगेंद्रसिंह जाधव यांनी दिली.

  असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास psiआखाडे,मदण येरणे, प्रशांत गिरडकर करीत आहे,सणासुदीच्या काळामध्ये पकडण्यात आलेले दोन ट्रॅक्टर महसूल विभाग कारवाई करत जप्ती करणार का याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Share News

More From Author

चाय वाल्याची मुलगी बनली साहायक प्रकल्प अधिकारी

युवकाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *